संरक्षण मंत्रालय
द्विपक्षीय चर्चेसाठी कझाकस्तानचे संरक्षण मंत्री भारत भेटीवर
Posted On:
07 APR 2021 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2021
कझाकस्तान प्रजासत्ताकाचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल नुर्लान येर्मेकबायेव्ह आजपासून 10 एप्रिलपर्यंतच्या कालावधीत अधिकृत भारत भेटीसाठी येत आहेत. कझाक संरक्षणमंत्र्यांचे आज जोधपुर येथे आगमन होणार असून त्यानंतर ते विविध बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि संरक्षणविषयक संस्थांना भेटी देण्यासाठी जैसलमेर, नवी दिल्ली तसेच आग्रा येथे जाणार आहेत.
लेफ्टनंट जनरल नुर्लान येर्मेकबायेव्ह यांची केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी नवी दिल्ली येथे शुक्रवारी, 9 एप्रिल रोजी द्विपक्षीय बैठक होणार आहे. कझाकस्तानचे संरक्षणमंत्री म्हणून फेरनिवड झाल्यानंतर लेफ्टनंट जनरल नुर्लान येर्मेकबायेव्ह यांची ही पहिलीच बैठक असेल.
याआधी, शांघाय सहकार्य संघटनेतील सहभागी देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी, 5 सप्टेंबर 2020 ला या दोन्ही नेत्यांची मॉस्को येथे भेट झाली होती. केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचे आमंत्रण स्वीकारून कझाक संरक्षणमंत्री भारतभेटीवर आले आहेत.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710163)
Visitor Counter : 232