PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 06 APR 2021 7:24PM by PIB Mumbai

 

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

 

Image

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड 19 विरूद्ध भारताच्या लढाईतील महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवत गेल्या 24 तासांत 43 लाखाहून अधिक लसींचे डोस दिले गेले. हे देशातील आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वोच्च लसीकरण आहे.

 

लसीकरण मोहिमेच्या (5 एप्रिल , 2021) च्या 80 व्या दिवसापर्यंत लसींचे 43,00,966 डोस देण्यात आले. त्यापैकी 39,00,505 लाभार्थ्यांना 48,095 सत्रांमध्ये प्रथम डोससाठी लसीकरण करण्यात आले आणि 4,00,461 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस प्राप्त झाला.

आणखी एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवताना , देशभरात राबविल्या जात असलेल्या कोविड 19 लसीच्या डोसची एकूण संख्या आज 8.31 कोटीच्या पुढे गेली आहे. पहिल्या डोसच्या लसीकरणानेही 7 कोटी (7,22,77,309) चा टप्पा ओलांडला आहे

भारतात दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 96,982 नवीन रुग्ण आढळले.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात या आठ राज्यांत कोविडच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 80.04% या 8 राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात सर्वाधिक 47,288 रुग्ण आढळले.

भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 7,88,223 वर पोहोचली आहे. त्यात आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 6.21 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येतून 46,393 रुग्णांची वाढ झाली आहे.

देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी जवळपास 57.42% एकट्या महाराष्ट्रात आहेत .

देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1,17,32,279 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 92.48% आहे.

गेल्या 24 तासात 50,143 रुग्ण बरे झाले

गेल्या 24 तासांत 446 मृत्यूची नोंद झाली.

नवीन मृत्यूंमध्ये 80.94 टक्के मृत्यू आठ राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 155 मृत्यूंची नोंद झाली आहे.

 

  इतर अपडेट्स :

  • केंद्र सरकारने 50 उच्चस्तरीय विविध शाखीय तज्ञांची पथके तयार करून ती महाराष्ट्र, छत्तीसगढ़ आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये पाठवली आहेत. या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येत असलेल्या दैनंदिन कोविड-19 केसेस आणि सातत्याने नोंदवला जात असलेला दैनिक मृत्यूदर या पार्श्वभूमीवर केंद्राने हे पाऊल उचलले आहे. कोविड-19 सर्वेक्षण, नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या संदर्भात राज्य आरोग्य मंत्रालय आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी ही पथके त्वरेने रवानाही झाली आहेत. महाराष्ट्रातील 30 जिल्हे, छत्तीसगढ़मधील 11 जिल्हे तसेच पंजाबातील 9 जिल्ह्यांमध्ये ही पथके त्वरीत रवाना झाली आहेत. या द्विसदस्यीय पथकात आरोग्य चिकित्सक/साथरोगतज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ञ यांचा समावेश आहे. ही पथके ताबडतोब त्या त्या राज्यांना भेट देऊन कोविड-19 व्यवस्थापनाची अंमलबजावणी, विशेषतः तपासणी, सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाय तसेच कोविड सुसंगत आचरण आणि त्याची अंमलबजावणी, रुग्णालयातील उपलब्ध रुग्णशय्यांची संख्या, रुग्णवाहिकांसह, व्हेंटीलेटर्स, वैद्यकीय प्राणवायू या संदर्भातील उपलब्ध वाहतूक व्यवस्था आणि लसीकरणाची प्रगती या सर्व परिस्थितीचा आढावा घेतील

 

  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्लीत एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्मचा (आयएचआयपी) व्हर्चुअल शुभारंभ केला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत हे देखील डिजिटल पद्धतीने उपस्थित होते. एकात्मिक आरोग्य माहिती मंच हा सध्या वापरल्या जात असलेल्या एकात्मिक आजार देखरेख कार्यक्रमाची (आयडीएसपी) सुधारित आणि अद्ययावत आवृत्ती आहे.
  • कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने 45 वर्षावरील  केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 80  लाख मात्रा देणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन, राज्यातील 25 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे. लसीच्या 1.5 कोटी अतिरिक्त मात्रा केंद्र सरकारने द्याव्यात अशीही विनंती राज्य सरकारने केली आहे. महाराष्ट्रात सोमवारी 47,288 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या 4.5 लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, कोविड व्यवस्थापनाच्या दृष्टीने  राज्य आरोग्य विभाग आणि अंमलबजावणी संस्थांना साहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात तज्ज्ञांची 30 पथके पाठवली आहेत.

 

FACT CHECK

 

 

A stamp with the word Fake on an order claiming to be issued in the by Reserve Bank of India and states that the Indian demonetized currency notes exchange facility to foreign citizens will end on April 30, 2021

 

Image

 

Image

Image

Image

Image

***

M.Chopade/P.Kkor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709914) Visitor Counter : 1150