आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यात मोठ्या संख्येने दैनंदिन रुग्ण


देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या 6 कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या

Posted On: 29 MAR 2021 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2021

 
महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगड या आठ राज्यात दैनंदिन रुग्णांची मोठ्या संख्येने नोंद होत आहे. नव्या रुग्णांपैकी 84.5% रुग्ण या आठ राज्यात आहेत. 

गेल्या 24 तासात 68,020 नव्या रुग्णांची नोंद झाली. 

   

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 40,414 नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकमध्ये 3,082 तर पंजाबमध्ये  2,870 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज एकूण  सक्रीय रुग्णसंख्या 5,21,808 आहे. भारतातली सध्याची सक्रीय रुग्ण संख्या ही एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 4.33% आहे. 

  

देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या 6 कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 9,92,483 सत्राद्वारे 6.05 कोटीहून अधिक (6,05,30,435) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

HCWs

FLWs

45 to <60 years with Co-morbidities

Over 60 years

 

Total

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

1st Dose

81,56,997

51,78,065

89,12,113

36,92,136

67,31,223

2,78,59,901

6,05,30,435

Date:28th March,2021

HCWs

FLWs

45to<60yearswithCo-morbidities

Over60years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

1stDose

1stDose

2ndDose

4,189

2,468

22,067

39,387

57,561

1,34,981

2,18,798

41,855

भारतात 1,13,55,993 कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 94.32% आहे. 

गेल्या 24 तासात 32,231 रुग्ण कोरोनातून बरे झाले. 

महाराष्ट्रात एका दिवसातले सर्वात जास्त म्हणजे 17,874  रुग्ण बरे झाले. 

गेल्या 24 तासात 291 मृत्यूंची नोंद झाली. 

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 108 मृत्यूंची नोंद झाली. 

  

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1708268) Visitor Counter : 314