शिक्षण मंत्रालय

केंद्रीय विद्यालयांमधील प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू होणार


नोंदणी पोर्टल 1 ते 19 एप्रिल या तारखेदरम्यान खुले राहील

देशभरातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन नोंदणी

Posted On: 27 MAR 2021 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2021

 

केंद्रीय विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष  2021-2022 साठी  इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 1 एप्रिल 2021 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होईल, तर इयत्ता दुसरी आणि त्यापुढील इयत्तांसाठी नोंदणी 8  एप्रिल 2021 पासून ऑफलाईन पद्धतीने करता येईल.

इयत्ता पहिलीसाठी ऑनलाइन नोंदणी 1 एप्रिल 2021रोजी सकाळी  10 वाजता सुरू होईल आणि 19 एप्रिल  2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता बंद होईल. प्रवेशासंबंधी माहिती https://kvsonlineadmission.kvs.gov.in/apps संकेतस्थळावरून तसेच  Android मोबाइल ऍपद्वारे  मिळू शकेल.

2021-2022 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या केंद्रीय विद्यालयामध्ये ऑनलाइन प्रवेशासाठी अधिकृत अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल अ‍ॅप आणि अ‍ॅप डाउनलोड आणि इनस्टॉल करण्यासाठी सूचना https://kvsonlineadmission.kvs.gov.in/apps वर आणि Google Play Store वर उपलब्ध असतील.

इयत्ता दुसरी आणि त्यापुढे  प्रवेश घेण्यासाठी सकाळी 08.04.2021 रोजी सकाळी 8:00  ते 15.04.2021 रोजी  दुपारी  4:00 पर्यंत या वेळेत ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध जागांच्या आधारे नोंदणी करता येईल.

इयत्ता अकरावीसाठी केव्हीएस (मुख्यालय) संकेतस्थळ  (https://kvsangathan.nic.in) वर उपलब्ध असलेल्या 2021-2022 प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार नोंदणी अर्ज विद्यालय संकेतस्थळावरून  डाउनलोड केले जाऊ शकतात.

सर्व इयत्तांसाठी वयाची गणना 31.03.2021 रोजीची धरली जाईल. जागांचे आरक्षण  संकेतस्थळांवर (https://kvsangathan.nic.in) वर उपलब्ध असलेल्या केव्हीएस प्रवेश मार्गदर्शक सूचनानुसार  असेल

कोविड -19 च्या सध्याच्या परिस्थितीत केव्हीएस सर्व पालकांना आवाहन  करते की त्यांनी सक्षम अधिकाऱ्यानी (केंद्रीय / राज्य / स्थानिक) जारी केलेल्या निर्देशांचे पालन करावे.

सध्या केंद्रीय विद्यालय संघटना 1247 केंद्रीय विदयालयांची साखळी चालवत आहे.


* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1708081) Visitor Counter : 181