पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची बांग्लादेशाच्या राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला भेट
Posted On:
26 MAR 2021 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन दिवसांच्या बांग्लादेश भेटीदरम्यान प्रथम राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला (जतियोस्रितीशौधो) भेट दिली. बांग्लादेशच्या 1971 मधील स्वातंत्र्यलढ्यातील शहीदांचे शौर्य व त्याग यांच्या स्मरणार्थ उभारलेले हे बांग्लादेशचे राष्ट्रीय स्मारक, ढाक्यापासून 35 किलोमीटरवरील सावर या ठिकाणी आहे. सय्यद मैनुल हुसैंन यांच्या कल्पनेतून ते साकार झाले आहे.

स्मारकाच्या प्रांगणात पंतप्रधानांनी अर्जुन वृक्षाचे रोप लावले आणि स्मारकाच्या अभ्यागत पुस्तिकेत नोंदही केली. ‘सावर’ या स्थानावरील ही अमर ज्योत, सत्य आणि धैर्याने, कपट व हुकुमशाही यावर मिळवलेल्या विजयाची आठवण देत सदैव तेवत राहो, ही माझी प्रार्थना”, असे त्यांनी लिहीले आहे.
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707804)
Visitor Counter : 266
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam