पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महामहिम जोसेफ आर. बायडेन यांच्यात दूरध्वनीवरून संवाद

प्रविष्टि तिथि: 08 FEB 2021 11:55PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महामहिम महामहिम जोसेफ आर. बायडेन यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला. 

पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे  हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यापुढील काळात भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारीला आणखी उन्नत करण्यासाठी त्यांच्यासोबत मिळून काम करण्याची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. उभय नेत्यांनी प्रादेशिक विकास आणि भू - राजकीय घडामोडींसंदर्भात व्यापक चर्चा केली. लोकशाही मूल्ये आणि समान धोरणात्मक  हिताच्या सामायिक वचनबद्धतेसाठी  भारत - अमेरिका भागीदारी दृढ आहे, याचा त्यांनी स्वीकार केला . नियमाधारित आंतराष्ट्रीय व्यवस्था , मुक्त , खुले आणि सर्वसमावेशक भारत - प्रशांत क्षेत्र सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने त्यांनी समविचारी  देशांसोबत काम करण्याचे महत्व  अधोरेखित केले. 

पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जागतिक हवामान बदलाच्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी एकत्रित काम करण्याची  आवश्यकता मान्य केली. पॅरिस करारासंदर्भात  पुन्हा वचनबद्धता दर्शविण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी स्वागत केले आणि भारताने अक्षय्य ऊर्जेसंदर्भात निर्धारित केलेल्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांबाबत माहिती दिली. यंदा एप्रिल महिन्यात क्लायमेट लीडर्स समिट ही परिषद आयोजित केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी स्वागत केले.आणि या परिषदेत सहभागी होण्याबाबत उत्सुकता दर्शविली . 

पंतप्रधांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि डॉ. जील बायडेन यांना त्यांच्या सोयीनुसार भारतात येण्यासाठी आमंत्रित केले. 

***

JPS/DY

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1707744) आगंतुक पटल : 232
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam