पंतप्रधान कार्यालय
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पंतप्रधानांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
10 FEB 2021 11:07PM by PIB Mumbai
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.
कॅनडाला भारताकडून कोविड -19 लसी हव्या आहेत असे पंतप्रधान ट्रूडो यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना आश्वासन दिले की, कॅनडाच्या लसीकरण प्रयत्नांना मदत करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल, ज्याप्रमाणे इतर देशांसाठी भारताने केले आहेत.
भारताबाबत कौतुक व्यक्त करताना पंतप्रधान ट्रूडो म्हणाले की, जग कोविड -19 वर विजय मिळवण्यात यशस्वी झाले तर त्याचे श्रेय प्रामुख्याने भारताची प्रचंड औषधनिर्माण क्षमता आणि ही क्षमता जगाबरोबर सामायिक करण्यात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला जाईल. ट्रूडो यांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
***
ST/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1707741)
आगंतुक पटल : 278
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam