कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप अर्थात अभ्यासवृत्तीसाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने, 9 भारतीय व्यवस्थापन संस्थांच्या सहकार्याने 27 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागवले आहेत.
Posted On:
25 MAR 2021 3:16PM by PIB Mumbai
महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप अर्थात अभ्यासवृत्तीसाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने, 9 भारतीय व्यवस्थापन संस्थांच्या सहकार्याने 27 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागवले आहेत. ही फेलोशिप अर्थात अभ्यासवृत्ती दोन वर्षांचा संमिश्र कार्यक्रम असून यात आयआयएममधील वर्ग-सत्र आणि जिल्हा स्तरावराच्या अर्थव्यवस्थेमध्ये कौशल्य नियोजन आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी काम कार्याची अनोखी संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध असते.
यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने आयआयएम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद, आयआयएम बंगळुरु, आयआयएम-जम्मू, आयआयएम कोझिकोड, आयआयएम लखनऊ, आयआयएम नागपूर, आयआयएम रांची, आयआयएम उदयपूर आणि आयआयएम विशाखापट्टणम यांच्या सहकार्याने 'महात्मा गांधी राष्ट्रीय अभ्यासवृत्ती (फेलोशिप)' (एमजीएनएफ) 2021-23 ची घोषणा केली. तरुण तसेच प्रतिभावान, कृतीशील व्यक्तींना आयआयएमच्या वर्ग-सत्रांमधे एकत्र येत अभ्यास करण्याची आणि जिल्हा पातळीवरच्या अर्थव्यवस्थेत कौशल्य विकास आणि कौशल्य नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी होण्याची ही एक अनोखी संधी आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची चोख अंमलबजावणी हे एक मोठे यश आहे. विविध घटकांनी याचे कौतुक केले आहे.
पूर्वीच्या सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा संबंधित जिल्हा कौशल्य समित्यांवर विशेष ठसा उमटवला आहे. काहींनी इथे शिकलेल्या व्यवसाय व्यवस्थापन, सार्वजनिक धोरण आणि विकास अर्थशास्त्र आदींच्या ज्ञानाचा उपयोग करत कल्पक प्रकल्प तयार केले. या अंतर्गत संबंधित जिल्ह्याची क्षमता समजून घेऊन रोजगारासाठी उपयोगी ठरणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे. काही उपक्रम बचत गटांसंबंधित आहेत; इतर उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तिथल्या बाजारपेठांमधे काही बदल करण्याबाबतचे आहेत.
कार्यक्रमाचे स्वरुप
एमजीएनएफ अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप हा कार्यक्रम विकासाच्या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्याच्यादृष्टीने तयार केला आहे - विकासाच्या टॉप-डाऊन पध्दतीऐवजी बॉटम-अप दृष्टिकोण हा देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास नेण्याची क्षमता या धोरणात आहे. यामध्ये आयआयएमकडून शैक्षणिक सहकार्य (एएम) तसेच सतत शिक्षक-तज्ञांचे मार्गदर्शन आणि सहभागी विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे.
व्यवस्थापनाची तत्त्वे, आर्थिक विकास, सार्वजनिक धोरण आणि सॉफ्ट कौशल्यांवर एएम शैक्षणिक सहकार्य लक्ष केंद्रित करते. एमजीएन फेलोंच्या (सहभागी विद्यार्थ्यांच्या) गरजा पूर्ण करण्यासाठी आणि संबंधित जिल्ह्यातील कौशल्य-आधारित अर्थव्यवस्था लवचिक तसेच सक्षम करण्याची संधी आणि आव्हाने समजून घेण्याची तसेच त्यास पाठबळ देण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी आणि पायाभूत सुविधा जाणून घेण्यासाठी यास तयार केले आहे. जिल्हा पातळीवरील संस्थात्मक त्रुटींचे दस्तावेजीकरण, चांगल्या सक्रीय योजनांची नोंद घेणे, स्त्रोतांचे सविस्तर आरेखन करणे, शोध घेणे आणि जिल्हा कौशल्य विकास आराखडा तयार करणे यासाठी जिल्हा पातळीवर सातत्यपूर्ण कठोर संशोधन करुन जिल्ह्यातील आर्थिक विकासाची रणनीती ठरविणारी योजना तयार करणे यांचा यात अंतर्भाव आहे.
अर्जदारांसाठी पात्रता निकष
देशभरातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत आणि कार्यक्रमाच्या आवश्यकतांमध्ये हे समाविष्ट आहे:
भारताचे नागरिक असले पाहिजे.
अर्ज करताना 21-30 वर्षांच्या दरम्यान वय,
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर,
0-3 वर्षांचा प्राधान्यीकृत कामाचा अनुभव
जिल्हा पातळीवरील कार्यक्रमासाठी अधिकृत राज्य भाषेवर प्रभुत्व अनिवार्य
फक्त ऑनलाईन अर्ज करा
27 मार्च 2021 किंवा त्यापूर्वी https://www.iimb.ac.in/mgnf. या संकेतस्थळावर.
महात्मा गांधी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) 2021-23, संपूर्ण भारतातील 660 हून अधिक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बंगळूरु, आयआयएम जम्मू, आयआयएम कोझिकोड, आयआयएम लखनऊ, आयआयएम नागपूर, आयआयएम रांची, आयआयएम उदयपूर आणि आयआयएम विशाखापट्टणम या नऊ आयआयएम यांनी या अभ्यास कार्यक्रमाचे स्वतंत्रपणे आयोजन केले आहे. तर आयआयएम बंगळुरू यासाठीची सामायिक प्रवेश परिक्षा घेणार आहे.
Jaydevi PS/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707512)
Visitor Counter : 262