संरक्षण मंत्रालय
शॉर्ट सर्विस कमिशन च्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सैन्याच्या रँक वापरण्यास संरक्षण मंत्रालयाची परवानगी
Posted On:
24 MAR 2021 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2021
लष्कराच्या शॉर्ट सर्विस कमिशन मधील (एस एस सी) सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना त्यांना लागू असलेल्या सैन्य रँकचा वापर करायला परवानगी देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे शॉर्ट सर्विस कमिशन मधील कर्मचाऱ्यांनी नोकरी संपल्यानंतर त्यांना सैन्य श्रेणींचा अधिकृत वापर करायला परवानगी नव्हती, यामुळे कामाचे समान स्वरूप असलेल्या स्थायी आयोगातील अधिकाऱ्यांप्रमाणेच समान सेवा अटी आणि सारखेच कष्ट असणाऱ्या शॉर्ट सर्विस कमिशन अधिकाऱ्यांमध्ये असमाधान आणि असंतोष होता.
सरकारच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त शॉर्ट सर्विस कमिशन अधिका-यांमधील असमाधान आणि असंतोष तर दूर होईलच आणि युवा वर्गातील इच्छुकांना याचा मोठा फायदा होईल. याव्यतिरिक्त,हा निर्णय शॉर्ट सर्विस कमिशन च्या विद्यमान अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवेल.
सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शॉर्ट सर्विस कमिशन अधिकाऱ्यांना सैन्य श्रेणीचा वापर करू देण्याची मागणी 1983 पासून प्रलंबित होती. शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी हे लष्कराच्या सहायक तुकडीचा कणा आहेत . ते विभागातील तरुण अधिकाऱ्यांची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने 10-14 वर्षांच्या कालावधीत आपली सेवा देतात .शॉर्ट सर्विस कमिशन आकर्षक बनविण्याचे अनेक प्रयत्न झाले. या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सैन्य श्रेणीचा वापर करण्यासाठी परवानगी देणे ही मागणी त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक आहे.
पूर्वीचे शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी पाच वर्षांच्या कालावधीत सेवा देत असत , आता ते दहा वर्ष मुदतीच्या कालावधीत सेवा देतात, त्यांनतर ते ही मुदत चार वर्षांनी वाढवू शकतात . शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी हे लष्कराच्या अधिकारी तुकडीला सहाय्यक तुकडी म्हणून उपलब्ध असतात, विभागाला प्रामुख्याने तरुण अधिकारी मिळावेत यासाठी हा आयोग तयार करण्यात आला आहे.
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707231)