आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये दैनंदिन नवीन रुग्ण संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ कायम


देशातील वाढत्या कोविड-19 रुग्ण संख्येवर केंद्र सरकार राज्य / केंद्रशासित प्रदेशांसोबत समन्वय साधून बारकाईने नजर ठेवून आहे

कोविड लसीचे सुमारे 4 कोटी डोस दिले

Posted On: 19 MAR 2021 11:11AM by PIB Mumbai

देशातील काही राज्यांमध्ये नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे. नव्या रुग्णांपैकी 80.63% रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक,गुजरात, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील आहेत.

गेल्या 24 तासांत 39,726 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  

देशभरात नव्या प्रतिदिन नोंदल्या गेलेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 65% म्हणजे 25,833 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पंजाब मध्ये 2,369 आणि केरळमध्ये 1899 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

 

खाली दर्शविल्याप्रमाणे, देशातील आठ राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड रुग्णांच्या संख्येचा आलेख सतत चढता राहिला आहे.

 

केंद्र सरकार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विशेषतः जिथे दैनंदिन रुग्ण संख्येत निरंतर वाढ निदर्शनाला येत आहे त्यांच्याशी सक्रीय समन्वय साधत आहे. केंद्र सरकार त्यांच्याबरोबर कोविड नियंत्रणाची स्थिती व सार्वजनिक आरोग्याच्या उपायांचा नियमितपणे आढावा घेत आहे.

महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये अलीकडे वाढत असलेली कोविडच्या रुग्णाची संख्या लक्षात घेता कोविड-19 नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपायांना सहाय्य करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र व पंजाब येथे उच्चस्तरीय सार्वजनिक आरोग्य पथके नियुक्त केली आहेत. याआधी केंद्र सरकारने कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात राज्यांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर येथे उच्चस्तरीय पथके नियुक्ती केली होती.  पुढील पाठपुरावा कारवाईसाठी केंद्रीय पथकांचे अहवाल राज्यांसमवेत सामायिक केले जातात. 

आतापर्यंतच्या देशभरातील एकूण कोविड रुग्णांच्या संख्येच्या 2.82% म्हणजे 2.71लाख  (2,71,282)  सक्रीय कोविड रुग्ण सध्या देशात आहेत गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णांमधून 18,918 रुग्णांची नोंद झाली आहे.

देशभरातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 76.48% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आहेत. 

आज सकाळी सात वाजेपर्यंत, 6,47,480 सत्रांच्या आयोजनातून सुमारे चार कोटी कोविड विरोधी लसीचे (3,93,39,817) डोस देण्यात आले आहेत.

यामध्ये 76,35,188 आरोग्य कर्मचारी (पहिला डोस), 47,15,173 आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस), 78,33,278 पहिल्या फळीतील कर्मचारी (पहिला डोस), आणि 21,98,414 पहिल्या फळीतील कर्मचारी (दुसरा डोस) यांच्यासह 45 वर्षांपेक्षा अधिक वय आणि विशिष्ट सहव्याधी  असणारे 27,79,998 लाभार्थी (पहिला डोस) आणि 60 वर्षांहून अधिक वय असणारे 1,41,77,766 लाभार्थी यांचा समावेश आहे. 

  

HCWs

FLWs

45 to <60 years with Co-morbidities

Over 60 years

 

Total

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

1st Dose

76,35,188

47,15,173

78,33,278

21,98,414

27,79,998

1,41,77,766

3,93,39,817

 

लसीकरण मोहिमेच्या 60 व्या दिवशी म्हणजे 16 मार्च 2021 रोजी लसीचे 22 लाखांहून जास्त (22,02,861) डोस देण्यात आले. 

यापैकी 18,32,287 लाभार्थ्यांना (आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचारी) 32,128 सत्रांमध्ये लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 3,70,574 आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला.  

 

Date: 18th March, 2021

HCWs

FLWs

45to<60 years with Co-morbidities

Over 60years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

1stDose

1stDose

2ndDose

 

65,152

81,698

1,16,527

2,88,876

3,22,595

13,28,013

18,32,287

3,70,574

 

 

भारतात आतापर्यंत एकूण कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आज रोजी 1,10,83,679 आहे. राष्ट्रीय रोगमुक्तता दर 96.56% आहे. 

देशातील आंध्रप्रदेश, चंडीगड, ओदिशा, उत्तराखंड, झारखंड, लक्षद्वीप, सिक्कीम, मेघालय, दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, नागालँड, त्रिपुरा, लडाख (कें.प्र.) मणिपूर, मिझोरम, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरुणाचल प्रदेश या 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत एकाही कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.  

***

Umesh U/SM/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705986) Visitor Counter : 219