पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा
Posted On:
16 MAR 2021 9:50PM by PIB Mumbai
बांगलादेशाच्या पंतप्रधान महामहीम शेख हसीना यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 आणि 27 मार्च 2021 रोजी बांगलादेशच्या दौर्यावर जाणार आहेत. मुजीब बोर्शो, शेख मुजीबूर रहमान यांची जन्मशताब्दी; भारत आणि बांगलादेश यांच्यात राजनैतिक संबंधांची 50 वर्षे; आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाची 50 वर्षे या तीन कार्यक्रमांच्या निमित्ताने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी 2015 मध्ये बांगलादेशला भेट दिली होती.
या भेटीदरम्यान पंतप्रधान 26 मार्च रोजी बांगलादेशच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी द्विपक्षीय सल्लामसलत करण्या व्यतिरिक्त मोदी बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष महामहीम मोहम्मद अब्दुल हमीद यांची देखील भेट घेतील. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन हे देखील पंतप्रधान मोदी यांची भेट घेतील.
कोविड साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. यातून भारताचे बांगलादेशप्रती असलेले प्राधान्य अधोरेखित होते.
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705294)
Visitor Counter : 250
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam