आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड 19 विरोधातल्या लढाईत भारताने अनेक उच्चांक नोंदवले
देशभरात आतापर्यंत 3.29 कोटी लसींचे डोस दिले गेले
काल एकाच दिवशी 30 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली गेली
केवळ 15 दिवसात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1 कोटीहून अधिक लाभार्थीना लस देण्यात आली
Posted On:
16 MAR 2021 11:23AM by PIB Mumbai
कोविड 19 विरोधातल्या एकत्रित लढाईत भारताने आज अनेक उच्चांक नोंदवले. महत्त्वपूर्ण घडामोडीत , भारताने लसीकरणात 3.29 कोटींचा टप्पा ओलांडला आहे .
काल, देशात एका दिवसात सर्वाधिक तीस लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली.
केवळ 15 दिवसात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1 कोटीहून अधिक लाभार्थीना लस देण्यात आली
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अंतरिम माहितीनुसार आतापर्यंत 5,55,984 सत्रांद्वारे 3,29,47,432 लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 74,46,983 एचसीडब्ल्यू (पहिला डोस), 44,58,616 एचसीडब्ल्यू (दुसरा डोस), 74,74,406 एफएलडब्ल्यू (पहिला डोस) आणि 14,09,332 एफएलडब्ल्यू (दुसरा डोस) यांचा समावेश आहे. विशिष्ट अन्य आजार असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 18,88,727 लाभार्थीना पहिला डोस देण्यात आला तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1,02,69,368 लाभार्थीना लस देण्यात आली.
लसीकरण मोहिमेच्या (दि .15 मार्च 2021) 59 व्या दिवसापर्यंत, एकूण 30,39,394 लस मात्रा देण्यात आल्या आहेत . त्यापैकी 26,27,099 लाभार्थीना 42,919 सत्रांमध्ये पहिला डोस (एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यू) देण्यात आला आणि 4,12,295 एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यूंना लसीचा दुसरा डोस मिळाला.
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत 24,492 नवीन रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात 15,051 इतक्या सर्वाधिक संख्येने नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये 1,818 तर केरळमध्ये 1,054 नवीन रुग्ण आढळले आहेत.

दररोजच्या नवीन रुग्णनोंदीमध्ये आठ राज्यांनी वाढ दर्शवली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा ही राज्ये आहेत.


गेल्या एका महिन्यात केरळमध्ये रुग्णसंख्येत सातत्याने घसरण नोंदवली जात आहे
आज भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 2,23,432 वर पोहोचली आहे. भारतातील सध्याच्या सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.96% आहे.
भारताच्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 76.57 टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आहेत.

देशात घेण्यात आलेल्या एकूण चाचण्याची संख्या 22.8 कोटी (22,82,80,763) च्या पुढे गेली आहे. एकत्रित राष्ट्रीय सकारात्मकता दर सध्या 5% आहे.

गेल्या 24 तासांत 131 मृत्यूची नोंद झाली आहे.
नवीन मृत्यूंपैकी 82.44% मृत्यू सात राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात काल सर्वाधिक 48 मुत्यू झाले आहेत तर पंजाबमध्ये 27 आणि केरळमध्ये 11 मृत्यूची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत सोळा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी एकही कोविड मृत्यूची नोंद केलेली नाही. ही राज्ये आहेत- राजस्थान, चंदीगड , जम्मू-काश्मीर (केंद्रशासित प्रदेश ), ओदिशा , झारखंड, लक्षद्वीप, सिक्कीम, लडाख (केंद्रशासित प्रदेश ), दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली , मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, मिझोरम, अंदमान आणि निकोबार बेटे आणि अरुणाचल प्रदेश.
***
Jaydevi PS/SK/CY
****
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705056)
Visitor Counter : 296