पंतप्रधान कार्यालय

क्वाड देशांच्या पहिल्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण

Posted On: 12 MAR 2021 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2021

 

महामहीम,

अध्यक्ष बायडेन ,

पंतप्रधान मॉरिसन, आणि

पंतप्रधान सुगा,

मित्रांसमवेत  असणे चांगले असते !

या उपक्रमाबद्दल मी अध्यक्ष बायडेन  यांचे आभार मानतो.

महामहिम,

आपण आपल्या लोकशाही मूल्यांनी एकत्रित आहोत आणि एक मुक्त, खुल्या  आणि सर्वसमावेशक हिंद -प्रशांत क्षेत्रासाठी वचनबद्ध आहोत.

आपला  आजचा विषय  - लस, हवामान बदल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रानी    - क्वाडला  जगाच्या कल्याणासाठी एक शक्ती बनवले आहे .

जग हे एक कुटुंब मानणाऱ्या वसुधैव कुटुंबकम या भारताच्या प्राचीन तत्वज्ञानाचा विस्तार म्हणून मी याकडे  सकारात्मक दृष्टी म्हणून पाहतो.

आपल्या सामायिक मूल्यांची प्रगती करण्यासाठी आणि सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्राला  प्रोत्साहन देण्यासाठी आपण पूर्वीपेक्षा एकत्रितपणे  काम करू.

आजच्या शिखर परिषदेतून  असे दिसून येते क्वाड देश प्रगल्भ झाले आहेत.

ते आता या प्रदेशातील स्थैर्याचा महत्त्वपूर्ण स्तंभ असतील.

धन्यवाद.

 

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704492) Visitor Counter : 160