रेल्वे मंत्रालय

सध्या काही स्थानकांवर केलेली प्लॅटफाॅर्म तिकिटांच्या किंमतीतील वाढ ही गर्दीमुळे कोरोनाचा होणारा प्रसार थांबविण्यासाठी केलेला "तात्पुरता"उपाय आहे


स्थानकांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी तिकिटांचे दर वाढविण्याचे अधिकार 2015 सालापासून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (DRM)दिले आहेत

ही पध्दत अनेक वर्षांपासून रूढ आहे आणि कधीकधी कमी कालावधीत होणारी गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येते. यात कोणतेही नाविन्य नाही

प्लॅटफाॅर्म तिकिटांच्या किंमतीतील वाढीसंदर्भात माध्यमांतून काही अहवाल प्रसिद्ध होत आहेत

Posted On: 05 MAR 2021 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मार्च 2021
 

स्थानकांवर केलेली प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीतील वाढ ही तात्पुरती आहे आणि प्रवाशांची सुरक्षितता आणि  स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेला एक विभागीय उपाय आहे.

जास्त लोकांना  प्लॅटफॉर्मवर येण्यास परावृत्त करण्यासाठी परिस्थितीचे आकलन करून प्लॅटफाॅर्म तिकिटांच्या किंमतीत वेळोवेळी वाढ करण्यात येते.ही पध्दत अनेक वर्षांपासून रूढ आहे आणि गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून काही वेळा वापरला जातो, यात कोणतेही नाविन्य नाही.

काही राज्यांत कोविडचा वाढत चाललेला  प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेकानेक लोकांना अनावश्यक गर्दी करण्यापासून परावृत्त करत आहे. महामारीच्या काळात प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. हा केवळ सार्वजनिक हितासाठी केलेला प्रयोग आहे.

मार्च 2020 मधे रेल्वेच्या विविध  विभागांनी अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत वाढ केली.

स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे नियमन आणि नियंत्रण ही विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची जबाबदारी असते. 2015 सालापासून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना जत्रा, मेळावे अशा विशिष्ट वेळी आवश्यकतेनुसार गर्दचे नियमन करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर  वाढविण्याचे अधिकार दिले आहेत. क्षेत्र व्यवस्थापनाच्या आवश्यकतेनुसार तिकिटांचे दर बदलण्याचे अधिकार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहेत

आदेशाची लिंक

* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1702696) Visitor Counter : 116