गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
राहणीमान सुलभता निर्देशांक 2020 मधे बंगळूरु, पुणे, अहमदाबाद ही शहरे ठरली सर्वोत्तम. (मिलियन प्लस श्रेणी)
राहणीमान सुलभता निर्देशांक 2020 (इज ऑफ लिविंग इंडेक्स) आणि स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक 2020 ( म्युनिसिपल परफॉरमन्स इंडेक्स 2020) च्या मानांकनांची घोषणा
Posted On:
04 MAR 2021 3:36PM by PIB Mumbai
गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री हरदीपसिंग पुरी, यांनी राहणीमान सुलभता निर्देशांक (ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स,ईओएलआय 2020) आणि स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक (म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स, एमपीआय 2020) अंतिम मानांकनांची घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमात केली. मंत्रालयाचे सचिव श्री दुर्गा शंकर मिश्रा व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे आणि दहा लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीही राहणीमान सुलभता निर्देशांक 2020 अंतर्गत मानांकनाची घोषणा करण्यात आली. यासाठी 2020 मध्ये मूल्यांकन सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात १११ शहरांनी भाग घेतला. त्यांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. "दशलक्ष +" म्हणजेच दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असणारी शहरे आणि दहा लाखाहून कमी लोकसंख्या असणारी शहरे. यात स्मार्ट सिटीज कार्यक्रमाअंतर्गत सर्व शहरांचा समावेश करण्यात आला.
"दशलक्ष +" गटात बंगळुरू प्रथम क्रमांकावर, त्यानंतर पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोयंबतूर, वडोदरा, इंदूर आणि बृहन्मुंबई यांचा क्रमांक लागतो. दशलक्षाहून कमी गटात, राहणीमान सुलभता निर्देशांकात सिमला शहर सर्वोच्च स्थानावर असून त्यानंतर भुवनेश्वर, सिल्वासा, काकीनाडा, सालेम, वेल्लोर, गांधीनगर, गुरुग्राम, दावणगिरी आणि तिरुचिराप्पल्ली यांचा क्रमांक आहे .
राहणीमान सुलभता निर्देशांका (ईओएलआय ) प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक, एमपीआय 2020 अंतर्गत मुल्यांकन करण्यात आले. लोकसंख्येनुसार दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका आणि दशलक्षाहून कमी लोकसंख्या असलेल्या महापालिका यांची वर्गवारी करण्यात आली. "दशलक्ष +" गटात इंदूर, सर्वोत्तम महापालिका ठरली, त्यानंतर सूरत आणि भोपाळ यांचा क्रमांक आहे . दशलक्षाहून कमी लोकसंख्या गटात नवी दिल्ली नगरपरिषद आघाडीवर आली असून नंतर तिरुपती व गांधीनगर यांचा क्रमांक लागतो.
एमपीआय अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक ठरवताना पाच क्षेत्रातील 111 महापालिकांच्या क्षेत्रीय कामगिरीचे विश्लेषण केले. त्यामधे 20 विभाग आणि एकूण 100 निर्देशकांचा समावेश आहे. एमपीआय अंतर्गत सेवा वित्त, धोरण, तंत्रज्ञान आणि प्रशासन या पाच मुद्द्यांवर मुल्यांकन केले गेले.
ईओएलआय, ही एक अशी मूल्यांकन प्रणाली आहे जी राहणीमानाचा दर्जा आणि शहरी विकासासाठी विविध उपक्रमांच्या परिणामाचे मूल्यांकन करते. नागरिकांची जीवनशैली, शहराची आर्थिक क्षमता, तिचा टिकाऊपणा आणि लवचिकता यावर आधारित भारतभरातील भाग घेणार्या शहरांची विस्तृत माहिती ही प्रणाली प्रदान करते. याबाबत नागरीकांचे मत काय आहे? दृष्टिकोण काय आहे? याचाही समावेश मूल्यांकनात केला आहे.
राहणीमान सुलभता निर्देशांकाच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक (एमपीपी) सुरू करण्यात आला. सेवा, वित्त, धोरण, तंत्रज्ञान आणि कारभाराच्या पार्श्वभूमीवर पालिकांमध्ये स्थानिक सरकारची कामगिरी कशी आहे याचे मोजमाप करण्याचा हा प्रयत्न आहे.
ईओएलआय 2020 निर्देशांकाच्या सर्वेक्षणातत नागरीकांच्या दृष्टिकोनाला, मताला 30 % मुल्य ठेवण्यात आला असून यामुळे या प्रणालीची चौकट अधिकच भक्कम झाली आहे. त्याची व्याप्ती वाढली आहे. जीवनशैली, आर्थिक क्षमता, शाश्वतता अशा 13 श्रेणींमध्ये याचे परिक्षण करण्यात आले आहे.
पालिका क्षेत्रात नागरिकांना कशी सेवा मिळतेय याचे सर्वेक्षण करताना थेट नागरीकांकडूनच जाणून घेण्यात आले. त्यासाठी नागरीकांचा दृष्टिकोन सर्वेक्षण, सीपीएस घेण्यात आले.
मूल्यांकनाला 16 जानेवारी 2020 पासून सुरुवात झाली आणि ते 20 मार्च 2020 पर्यंत ते करण्यात आले. 111 शहरांमधील एकूण 32 लाख 20 हजार नागरिक सर्वेक्षणात सहभागी झाले होते. भुवनेश्वरमधे सर्वाधिक सीपीएस अर्थात,नागरीक दृष्टिकोन सर्वेक्षण झाले. त्यानंतर सिल्वासा, दावणगेरे, काकीनाडा, बिलासपूर आणि भागलपूर यांचा क्रमांक लागतो.
स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक 2020 (एमपीआय)
ईओएलई प्रणाली चौकट अधिक मजबूत करण्यासाठी त्याच्या व्याप्तीचा विस्तार करीत, देशात प्रथमच स्थानिक स्वराज्य कामगिरी निर्देशांक मूल्यांकन देखील केले गेले. स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक हा संबंधित पालिकांच्या कामगिरीच्या निश्चित मूल्यांच्या आधारे कामगिरीचे मूल्यांकन आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न आहे.
पहिल्या दहा क्रमांकाच्या शहरांचा तपशील खाली दिला आहे. दोन्ही निर्देशांकांमधील क्रमवारी https://eol.smartcities.gov.in वर ऑनलाइन पाहिली जाऊ शकतात.
शीर्ष 10 मानांकन
Rank
|
Ease of Living Index
|
Population Million+
|
|
Population Less than Million
|
City
|
Score
|
|
City
|
Score
|
1
|
Bengaluru
|
66.70
|
|
Shimla
|
60.90
|
2
|
Pune
|
66.27
|
|
Bhubaneshwar
|
59.85
|
3
|
Ahmedabad
|
64.87
|
|
Silvassa
|
58.43
|
4
|
Chennai
|
62.61
|
|
Kakinada
|
56.84
|
5
|
Surat
|
61.73
|
|
Salem
|
56.40
|
6
|
Navi Mumbai
|
61.60
|
|
Vellore
|
56.38
|
7
|
Coimbatore
|
59.72
|
|
Gandhinagar
|
56.25
|
8
|
Vadodara
|
59.24
|
|
Gurugram
|
56.00
|
9
|
Indore
|
58.58
|
|
Davangere
|
55.25
|
10
|
Greater Mumbai
|
58.23
|
|
Tiruchirapalli
|
55.24
|
Rank
|
Municipal Performance Index
|
Population Million+
|
|
Population Less than Million
|
Municipality
|
Score
|
|
Municipality
|
Score
|
1
|
Indore
|
66.08
|
|
New Delhi MC
|
52.92
|
2
|
Surat
|
60.82
|
|
Tirupati
|
51.69
|
3
|
Bhopal
|
59.04
|
|
Gandhinagar
|
51.59
|
4
|
Pimpri Chinchwad
|
59.00
|
|
Karnal
|
51.39
|
5
|
Pune
|
58.79
|
|
Salem
|
49.04
|
6
|
Ahmedabad
|
57.60
|
|
Tiruppur
|
48.92
|
7
|
Raipur
|
54.98
|
|
Bilaspur
|
47.99
|
8
|
Greater Mumbai
|
54.36
|
|
Udaipur
|
47.77
|
9
|
Visakhapatnam
|
52.77
|
|
Jhansi
|
47.04
|
10
|
Vadodara
|
52.68
|
|
Tirunelveli
|
47.02
|
अधिक माहितीसाठी https://eol.smartcities.gov.in वर भेट द्या
*****
Jaydevi PS/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702448)
Visitor Counter : 736