PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
03 MAR 2021 6:42PM by PIB Mumbai
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
दिल्ली/मुंबई, 3 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांना अभिवादन केले आहे.
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आज मी वन्यजीव संवर्धनासाठी काम करणार्या सर्वांना सलाम करतो. सिंह, वाघ किंवा बिबट्या असो, भारतात निरनिराळ्या प्राण्यांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. आमच्या जंगलांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू," असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर वरील संदेशात म्हंटले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारतीय सागरी परिषद (मेरीटाइम इंडिया समिट) 2021 ’ चे उद्घाटन केले. डेन्मार्कचे परिवहन मंत्री बेनी एंगलेब्रेक्ट, गुजरात आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान आणि मनसुख मांडवीय यावेळी उपस्थित होते.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णांच्या आकड्यामध्ये वाढ नोंदविली जात आहे. गेल्या 24 तासांत नोंदवलेल्या नवीन रुग्णांपैकी 85.95% रुग्ण या राज्यातील आहेत.
गेल्या 24 तासांत 14,989 नवीन रुग्णांची नोंद झाली झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक 7,863 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 2,938 तर पंजाबमध्ये 729 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
आठवड्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये नवीन रुग्ण संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे.
एकट्या महारष्ट्रात आठवड्याभरात 16,012 रुग्णांची वाढ झाली आहे.
टक्केवारीनुसार पंजाबमध्ये आठवड्यात 71.5% (1,783 रुग्ण) रुग्णांची वाढ झाली आहे.
सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत असलेल्या आणि दररोज नवीन कोविड रुग्णांची नोंद होणाऱ्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत केंद्र सरकार सतत संपर्कात आहे. कोविड -19 च्या सध्या वाढत असलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणायला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर येथे उच्चस्तरीय पथके रवाना केली आहेत. या तीन सदस्यीय पथकाचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयात सह-सचिव स्तरावरील अधिकारी करतील. हे पथक कोविड-19 च्या वाढत्या रुग्ण संख्येची कारणे शोधतील आणि कोविड-19 वर नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्य आरोग्य विभागांशी समन्वय साधतील.
भारतातील एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 1,70,126 वर पोहोचली आहे. भारतातील सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या 1.53% आहे.
खालील आलेख गेल्या 24 तासात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सक्रिय रुग्ण संख्येतील बदल दर्शवितो. केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्ण संख्येत घट दिसून येत आहे, तर त्याच काळात महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातमध्ये सक्रिय रुग्ण संख्येत वाढ दिसून आली आहे.
ज्या लाभार्थ्यांना पहिला डोस घेऊन 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा लाभार्थ्यांना कोविड-19 लसीकरणाचा दुसरा डोस 13 फेब्रुवारी, 2021 पासून देण्यास सुरुवात झाली आहे. एफएलडब्ल्यूचे लसीकरण 2 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू झाले.
60 वर्षापेक्षा अधिक वय असलेले नागरिक आणि सह-आजार असलेले 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी कोविड-19 लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मार्च 2021 पासून सुरु झाला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार 3,12,188 सत्रांद्वारे 1.56 कोटी (1,56,20,749) पेक्षा जास्त लसींचे डोस दिले आहेत. यामध्ये 67,42,187 एचसीडब्ल्यू (1 ला डोस), 27,13,144 एचसीडब्ल्यू (2 रा डोस), 55,70,230 एफएलडब्ल्यू (1 ला डोस) आणि 834 एफएलडब्ल्यू (दुसरा डोस), विशिष्ट सह-आजार असेलेले 45 वर्षांवरील 71,896 लाभार्थी (पहिला डोस) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5,22,458 लाभार्थी (पहिला डोस) समाविष्ट आहेत.
आतापर्यंत 1.08 कोटी (1,08,12,044) पेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 13,123 रूग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. नवीन रुग्णांपैकी 86.58% रुग्ण सहा राज्यातील आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक 6332 रुग्ण एका दिवशी बरे झाले. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 3,512 लोक आणि त्यानंतर तामिळनाडूमध्ये 473 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 98 मृत्यूची नोंद झाली आहे.
नवीन मृत्यूंपैकी 88.78% मृत्यू हे चार राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 54 मृत्यू झाले आहेत. मागील 24 तासात केरळमध्ये दररोज 16 आणि पंजाबमध्ये 10 मृत्यूची नोंद झाली आहे.
इतर अपडेट्स :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी नवी दिल्लीत एम्स येथे कोविड-19 लसीची पहिली मात्रा घेतली.
- कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीर या राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांबरोबर उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या राज्ये / केंद्र शासित प्रदेशांमध्ये गेल्या आठवड्यापासून सक्रिय रुग्णसंख्या किंवा नवीन कोविड बाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे. कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसाद धोरणाचा आढावा आणि चर्चा करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीला राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी तसेच केंद्रीय आरोग्य सचिव, आयसीएमआरचे महासंचालक , नीती आयोगाच्या सक्षम गटाचे सदस्य आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
- केंद्रीय आरोग्य सचिव श्री. राजेश भूषण यांच्यासह लस प्राधिकरण (को- विन) अधिकार प्राप्त समूहाचे अध्यक्ष आणि कोविड -19 लस प्राधिकरण राष्ट्रीय निर्यात समूहाचे सदस्य (एन ई जी व्ही ए सी) डॉ.आर .एस.शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (एनएचएम) व्यवस्थापकीय संचालक यांची 26 फेब्रुवारी रोजी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून वयोगटानुसार लसीकरण करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक झाली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 फेब्रुवारी रोजी ‘इंडिया टॉय फेअर 2021’ या खेळण्यांच्या प्रदर्शनाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. हे खेळणी प्रदर्शन आजपासून 2 मार्चपर्यंत चालणार आहे. 1000 पेक्षा जास्त कलाकार आणि व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
- डिजिटल मिडिया वापरकर्त्यांचे हक्क, उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेचा अभाव यासंदर्भातल्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आणि सार्वजनिक आणि संबंधितांशी विस्तृत चर्चेनंतर माहिती तंत्रज्ञान ( प्लॅटफॉर्म मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मिडिया आचारसंहिता) नियमावली 2021 आखण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 87 (2) अंतर्गत मिळालेल्या अधिकारा अंतर्गत आणि आधीचे माहिती तंत्रज्ञान (मध्यावधी मार्गदर्शक तत्वे) नियम 2011 रद्द ठरवत नवी नियमावली आखण्यात आली आहे.
- कोविडची आव्हाने असताना देखील, 28 फेब्रुवारी 2021 रोजी, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीचे प्रमाण अधिक
महाराष्ट्र अपडेट्स
महाराष्ट्र: कोविड लसीकरणासाठी मुंबईतील 29 खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. मुंबईतील मान्यताप्राप्त कोविड लसीकरण केंद्रा बाहेरील कालच्या लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा बघता लसीकरण जलद गतीने व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- नवीन रुग्ण-7,863
- बरे झालेले -6,332
- मृत्यू. 54
- सक्रिय रुग्ण 79,093
- आजमितीस एकूण रुग्ण 21,69,330
- आजमितीस एकूण बरे झालेल्यांची संख्या. 20,36,790
- आजमितीस एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या. 52,238
FACT CHECK
* * *
M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702303)
Visitor Counter : 195