रेल्वे मंत्रालय

कोविडची आव्हाने असताना देखील, 28 फेब्रुवारी 2021 रोजी, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीचे प्रमाण अधिक

Posted On: 01 MAR 2021 6:33PM by PIB Mumbai

 

कोविडची आव्हाने असताना देखील, 28 फेब्रुवारी 2021 रोजी, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीचे प्रमाण अधिक आहे.

फेब्रुवारी 2021 या महिन्यात माल भरणे, उत्पन्न आणि वेग या संदर्भात मालवाहतुकीच्या आकड्यांनी चढ कल कायम राखला आहे. काल 5 दशलक्ष टनांहून अधिक माल भरणा झाला आहे.

28 फेब्रुवारी 2021 रोजी या वर्षात भारतीय रेल्वेची एकूण मालवाहतूक 1102.17 दशलक्ष टन होते जी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या 1102.1 दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत जास्त आहे.

महिन्यानुसार 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत भारतीय रेल्वेने 112.25 दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे जी मागील वर्षाच्या 28 फेब्रुवारीपर्यंतच्या काल्वाधीच्या तुलनेत जवळपास 10% जास्त आहे. (102.21 दशलक्ष टन).

फेब्रुवारी 2021 या महिन्यात मालवाहतूक गाड्यांचा सरासरी वेग 46.09 किमी प्रतितास इतका होता जो मागील वर्षीच्या याच  महिन्याच्या तुलनेत दुप्पट आहे (23.01 किमी प्रतितास). मागील वर्षाच्या 23.17 किलोमीटर तासाच्या तुलनेत 28 फेब्रुवारीला मालगाड्यांचा सरासरी वेग 47.51 किमी प्रतितास एवढा होता जो दुप्पटीहून अधिक आहे.

फेब्रुवारी 2021 या महिन्यात भारतीय रेल्वेला मालवाहतूकीतून 11096.89 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून मागील वर्षाच्या उत्पनाच्या तुलनेत ते 7.7% जास्त आहे

रेल्वे मालवाहतूक अत्यंत आकर्षक करण्यासाठी भारतीय रेल्वेद्वारे  अनेक सवलतीही दिल्या जात आहेत.

***

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701742) Visitor Counter : 197