सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

थावरचंद गहलोत उद्या “सुगम्य भारत ॲप" आणि “एक्सेस- द फोटो डायजेस्ट” पुस्तिकेचे  व्हर्च्युअल उदघाटन करणार

Posted On: 01 MAR 2021 1:30PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुगम्य भारत ॲप" आणि एक्सेस-द फोटो डायजेस्ट नावाच्या पुस्तिकेचे उदघाटन  करणार आहेत. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत अपंग व्यक्तींच्या सशक्तीकरण विभागाने (डीईपीडब्ल्यूडी) ॲप आणि पुस्तिका  विकसित केली आहे. उद्घाटन उद्या सकाळी 9.00 वाजता https://webcast.nic.in/msje/  येथे वेब-प्रसारित केले जाईल. त्यानंतर, अँड्रॉइड वापरकर्त्यांना प्ले स्टोअर वरून मोबाइल ॲप डाउनलोड करता येईल. अ‍ॅपची आयओएस आवृत्ती 15 मार्च 2021 पासून उपलब्ध असेल.

सुगम्य भारत ॲप-एक क्राऊड सोर्सिंग मोबाईल ऍप्लिकेशन आहे जे सुगम्य भारत  मोहिमेचे 3 स्तंभ म्हणजेच पर्यावरण, वाहतूक आणि आयसीटी परिसंस्था यात सुगम्यता आणि  संवेदनशीलता वाढवते.  अ‍ॅपमध्ये पाच मुख्य वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, त्यातील 4 सुगम्य प्रवेश संबंधित आहेत, तर पाचवे एक खास वैशिष्ट्य आहे जे केवळ दिव्यांगजनांसाठी कोविडशी संबंधित समस्यांसाठी आहे.

दिव्यांग सशक्तीकरण विभागाने एक्सेस - द फोटो डायजेस्ट नावाची  एक पुस्तिका देखील तयार केली  आहे ज्यामध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील छायाचित्रांचा संग्रह आहे. सुगम्यतेशी  संबंधित 10 मूलभूत वैशिष्ट्ये आणि त्याच्याशी संबंधित  चांगल्या-वाईट पद्धतींबद्दल संवेदनशील बनवण्याचे एक साधन आणि मार्गदर्शक म्हणून ही पुस्तिका तयार केली  आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701658) Visitor Counter : 241