आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केरळ, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये कोविडच्या नवीन रुग्ण संख्येत वाढ कायम

Posted On: 28 FEB 2021 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2021

 

भारताची एकूण सक्रिय रुग्ण संख्या आज 1,64,511 वर पोहोचली आहे. भारतातील सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या 1.48% इतके आहे.

मागील 24 तासात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये नवीन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 86.37% रुग्ण या 6 राज्यातील आहेत.

मागील 24 तासात 16,752 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक 8,623 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ केरळमध्ये 3,792 आणि पंजाबमध्ये 593 नवीन रुग्ण आढळले आहेत.

सक्रिय रुग्णसंख्या  आणि  नवीन कोविड बाधित रुग्णांमध्ये सतत वाढ होत असलेल्या राज्य आणि केंद्र शासितप्रदेशांसोबत केंद्र सरकार निरंतर संपर्क साधत आहे. कॅबिनेट सचिव यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीर या राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.  

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार 2,92,312 सत्रांद्वारे एकूण 1,43,01,266 लसींचे डोस देण्यात आले आहेत. यात 66,69,985 एचसीडब्ल्यू (1ला डोस), 24,56,191 एचसीडब्ल्यू (दुसरा डोस) आणि 51,75,090 एफएलडब्ल्यू (1 ला डोस) यांचा समावेश  आहे.

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोविड-19 लसीकरण केंद्रे म्हणून वापरली जाणारी सी.जी.एच.एस.  रुग्णालयांची यादी पुढील संकेत स्थळावर उपलब्ध आहे:

https://www.mohfw.gov.in/pdf/CGHSEmphospitals.xlsx

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोविड-19 लसीकरण केंद्रे म्हणून वापरली जाणारी आयुष्मान भारत-पीएमजेएवाय रुग्णालयांची यादी पुढील संकेत स्थळावर उपलब्ध आहे: https://www.mohfw.gov.in/pdf/PMJAYPRIVATEHOSPITALSCONSOLIDATED.xlsx

आतापर्यंत एकूण 1.07 कोटी (1,07,75,169) लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 11,718 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,648 लोक बरे झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक 51 मृत्यू झाले आहेत. 

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701503) Visitor Counter : 319