आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
महाराष्ट्रात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येत वाढ
रुग्ण संख्येत वाढ नोंदवणाऱ्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशात बहु शाखीय उच्च स्तरीय केंद्रीय पथके रवाना
Posted On:
25 FEB 2021 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
देशात आज सक्रीय रुग्ण संख्या 1,51,708 असून ही संख्या एकूण पॉझीटिव्ह रुग्णांच्या 1.37% आहे. महाराष्ट्र,केरळ,पंजाब,मध्य प्रदेश,तामिळनाडू,गुजरात आणि छत्तीसगड या राज्यात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून आल्याने ही संख्या झाली आहे.
गेल्या 24 तासात 16,738 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.
नव्या रुग्णांपैकी 89.57% रुग्ण 7 राज्यातले आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 8,807, केरळ मध्ये 4,106 तर पंजाब मध्ये 558 नव्या रुग्णांची नोंद झाली.
केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात आणि जम्मू-काश्मीर (केंद्रशासित प्रदेश) मध्ये केंद्र सरकारने उच्च स्तरीय बहु शाखीय पथके तैनात केली असून ही पथके या राज्यांमध्ये कोविडच्या वाढत्या रुग्णांची कारणे शोधून कोविड -19 नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्य आरोग्य विभागाला सहाय्य करणार आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत 2,64,315 सत्राद्वारे 1,26,71,163 लाभार्थींचे लसीकरण झाले. यामध्ये 65,47,831 आरोग्य कर्मचाऱ्यांचा ( पहिली मात्रा ) 16,16,348 आरोग्य कर्मचारी ( दुसरी मात्रा ) आणि 45,06,984 आघाडीवर राहून काम करणारे कर्मचारी ( पहिली मात्रा ) यांचा समावेश आहे.
कोरोनातून बरे झालेल्यांची भारतातली एकूण संख्या आज 1,07,38,501 आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज 97.21% आहे. एकूण बरे झालेल्यांची संख्या आणि सक्रीय रुग्ण यांच्यातले अंतर सातत्याने वाढत असून हे आज 10,586,793 होते. गेल्या 24 तासात 11,799 जण कोरोनातून बरे झाले.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700839)
Visitor Counter : 227