आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या आज 21.15 कोटींवर पोचली, देशभरात सध्या 2400 प्रयोगशाळा

Posted On: 22 FEB 2021 2:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2021


भारताने आज कोरोना चाचणीत नवा विक्रम केला आहे.आज देशभरातील चाचण्यांच्या संख्येने  21.15 कोटींचा (21,15,51,746)  टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात देशभरात एकूण 6,20,216 चाचण्या करण्यात आल्या.

देशातील चाचण्यांच्या प्रयोगशाळा आणि इतर साधनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, चाचण्यांची संख्या वाढवण्यात या प्रयोगशाळांची महत्वाची भूमिका आहे. आज देशात एकूण 2393 चाचणी प्रयोगशाळा असून त्यात 1,220 सरकारी आणि 1,173 खाजगी प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमुळे देशाची चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढली आहे.

सध्या देशात, राष्ट्रीय स्तरावर रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचा दर 5.20% झाला आहे. प्रती दशलक्ष संख्येमागे दररोज चाचणी होणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. आज भारतात प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात 1,53,298.4 चाचण्या केल्या जातात.

22 फेब्रुवारी 2021 पर्यंत लसीकरणाची एकूण 2,32,317 सत्रे झाली असून त्याद्वारे, आज सकाळी 8 वाजेपर्यंत 1,11,16,854 लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली आहे. यात, 63,97,849 आरोग्य कर्मचारी( पहिली मात्रा) 9,67,852 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा) आणि 37,51,153 पहिल्या फळीत कार्यरत कोरोनायोद्धे (पहिली मात्रा) यांचा समावेश आहे.

 

S.

No.

 

State/UT

Beneficiaries vaccinated

1stDose

2ndDose

Total Doses

1

A&N Islands

4,846

1,306

6,152

2

Andhra Pradesh

4,13,678

89,645

5,03,323

3

Arunachal Pradesh

19,702

4,041

23,743

4

Assam

1,54,754

11,050

1,65,804

5

Bihar

5,22,811

39,046

5,61,857

6

Chandigarh

12,953

795

13,748

7

Chhattisgarh

3,41,251

20,699

3,61,950

8

Dadra& Nagar Haveli

4,939

244

5,183

9

Daman & Diu

1,735

213

1,948

10

Delhi

2,94,081

17,329

3,11,410

11

Goa

15,070

1,113

16,183

12

Gujarat

8,22,193

60,925

8,83,118

13

Haryana

2,08,308

23,987

2,32,295

14

Himachal Pradesh

95,105

12,092

1,07,197

15

Jammu & Kashmir

2,00,695

6,731

2,07,426

16

Jharkhand

2,54,531

11,484

2,66,015

17

Karnataka

5,41,332

1,14,043

6,55,375

18

Kerala

3,99,284

38,829

4,38,113

19

Ladakh

5,827

600

6,427

20

Lakshadweep

1,809

115

1,924

21

Madhya Pradesh

6,40,805

3,778

6,44,583

22

Maharashtra

8,78,829

47,637

9,26,466

23

Manipur

40,215

1,711

41,926

24

Meghalaya

23,877

629

24,506

25

Mizoram

14,627

2,241

16,868

26

Nagaland

21,526

3,909

25,435

27

Odisha

4,38,127

94,966

5,33,093

28

Puducherry

9,251

853

10,104

29

Punjab

1,22,527

14,269

1,36,796

30

Rajasthan

7,82,701

38,358

8,21,059

31

Sikkim

11,865

700

12,565

32

Tamil Nadu

3,39,686

31,160

3,70,846

33

Telangana

2,80,973

87,159

3,68,132

34

Tripura

82,369

11,587

93,956

35

Uttar Pradesh

10,66,290

85,752

11,52,042

36

Uttarakhand

1,31,384

7,166

1,38,550

37

West Bengal

6,39,252

49,912

6,89,164

38

Miscellaneous

3,09,794

31,778

3,41,572

Total

1,01,49,002

9,67,852

1,11,16,854

 

भारतात आतापर्यंत एकूण 1.06 कोटी रुग्ण (1,06,99,410) कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 97.22% टक्के इतका आहे. सक्रीय रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,05,49,355 (71.3 पट) ने अधिक आहे.

गेल्या 24 तासांत 9,695 रुग्ण बरे होऊन त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

नव्याने आढळलेल्या रूग्णांपैकी 80.86% रुग्ण पाच राज्यांमधील आहेत.

केरळमध्ये एका दिवसांत 4,345 रुग्ण बरे झाले तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,417 इतकी आणि तमिळनाडू मध्ये 460 इतकी आहे.

सध्या देशात, एकूण  1.50 लाख (1,50,055) सक्रीय रुग्ण आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या प्रमाणात सध्या असलेल्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण 1.36% इतके आहे. गेल्या 24 तासांत, देशात 14,199 नवे रुग्ण आढळले.

महाराष्ट्रात आजही सर्वाधिक रुग्ण असून गेल्या 24 तासांत 6,971 रुग्ण आढळले. त्या खालोखाल 4,070 रुग्ण केरळमध्ये तर 452 रुग्ण तामिळनाडू मध्ये आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात एकूण 83 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

एकूण मृत्यूपैकी 78.31%  मृत्यू पाच राज्यांत झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 35 तर केरळमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला.


* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699902) Visitor Counter : 244