आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

तिसऱ्या इंडिया टुरिझम मार्टच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला डॉ हर्षवर्धन यांनी केले संबोधित

आरोग्य क्षेत्रातल्या आपल्या सुधारणांमुळे आपण जगातल्या सर्वोत्कृष्टतेशी तुलना करण्याच्या तोडीचे - डॉ हर्षवर्धन यांचे प्रतिपादन

Posted On: 18 FEB 2021 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज तिसऱ्या इंडिया टुरिझम मार्टच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला दूर दृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. भारतीय पर्यटन आणि आतिथ्य महासंघाने (एफएआयटीएच) हा कार्यक्रम आयोजित केला होता.

हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल एफएआयटीएचचे अभिनंदन करत हर्ष वर्धन यांनी यामध्ये 60 देशातले 250 प्रतिनिधी  दूर दृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाल्याची प्रशंसा केली. महामारीच्या खाईतून जग सावरत असताना आणि जगभरातले देश, आरोग्य विषयक आणि खबरदारीच्या सर्व उपायांसह पर्यटन क्षेत्र खुले करण्याच्या विचारात असताना  आयोजित करण्यात आलेल्या या तिसऱ्या इंडिया टुरिझम मार्टला अधिकच महत्व असल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.

कोविड-19 महामारी नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न ठळकपणे मांडताना, भारताने कोरोनासंदर्भात जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला सुरवात केल्याचे त्यांनी सांगितले. भारतातल्या 8.5 दशलक्ष हून अधिक जणांचे लसीकरण करण्याबरोबरच भारताकडे मदत मागणाऱ्या इतर देशांसाठी  लसीच्या लाखो मात्रा पाठवल्याचे ते म्हणाले.

भारत हा नेहमीच लोकप्रिय पर्यटन स्थान राहिला आहे त्याचबरोबर गेल्या काही वर्षात वैद्यकीय पर्यटनासाठीही भारत आघाडीचे स्थान म्हणून पुढे येत आहे. आरोग्य क्षेत्रातल्या आपल्या सुधारणांमुळे आपण जगातल्या सर्वोत्कृष्टतेशी  तुलना करण्याच्या तोडीचे असल्याचे ते म्हणाले. जागतिक तोडीचे डॉक्टर, परिचारिका आणि निम वैद्यकीय कर्मचारी घडवणारी आपली शिक्षण पद्धती जगभरात ओळखली जाते. जगाचे औषधालय म्हणून ओळखला जाणारा भारत, सर्वात मोठ्या औषध निर्मात्यांपैकी एक असून जगभरात मोठ्या प्रमाणात लसही पुरवतो. या सर्व सामर्थ्य आणि क्षमतांमुळे वैद्यकीय पर्यटनासाठी महत्वाचे ठिकाण म्हणून भारत पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी अधिक प्रोत्साहन देण्याकरिता वैद्यकीय व्हिसा द्यायला सुरवात केली असून लवकरच ई पर्यटक व्हिसा आणि नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरु करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.

 

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1699048) Visitor Counter : 12