अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या एकूण 363.4 कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी
प्रविष्टि तिथि:
17 FEB 2021 3:16PM by PIB Mumbai
प्रधानमंत्री किसान संपदा योजना (पीएमकेएसवाय) अंतर्गत अन्न प्रक्रिया आणि संरक्षण क्षमतांची निर्मिती/ विस्तार (सीईएफपीपीसी) तसेच अॅग्रो-प्रोसेसिंग क्लस्टर (एपीसी) साठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या योजनेंतर्गत आलेल्या प्रस्तावांचा विचार करण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दोन आंतर-मंत्रालयीय मंजूरी समितीची (आयएमएसी) बैठक काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. राज्यमंत्री रामेश्वर तेली हेही बैठकीस उपस्थित होते. प्रकल्पांच्या प्रवर्तकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत भाग घेतला.
आयएमएसीच्या बैठकीत मंजूर झालेल्या प्रकल्पांच्या प्रस्तावांमध्ये बागायती / कृषी उत्पादनांच्या प्रक्रियेची पातळी उंचावण्याची आणि मूल्यवर्धित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल.
बैठकीत मंजूर झालेल्या प्रस्तावांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
सीईएफपीपीसी अंतर्गतः
हिमाचल प्रदेश, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मिझोरम आणि गुजरात राज्यात 36.30 कोटी रुपये अनुदान सहाय्यासह 113.08 कोटी रुपयांच्या एकूण प्रकल्प खर्चासह 11 प्रस्ताव.
या प्रकल्पांद्वारे 76.78 कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणूकीचा लाभ होणार असून 3700 लोकांना रोजगार मिळण्याची आणि 6800 शेतकर्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
पीएमकेएसवाय अंतर्गत 05.05.2017 रोजी कृषी खाद्य उत्पादनांची प्रक्रिया / संवर्धन आणि अन्न प्रक्रियेचे आधुनिकीकरण / क्षमता वाढविण्यासाठी या योजनेस मंजुरी देण्यात आली. यामुळे प्रक्रियेची पातळी उंचावण्यात आणि मूल्यवर्धनात मदत होईल ज्यायोगे कृषी उत्पादनांचा अपव्यय कमी होईल.
एपीसीसाठी पायाभूत सुविधा निर्मिती अंतर्गतः
मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांमध्ये 66.61 कोटी रुपये अनुदान सहाय्यासह 250.32 कोटी रुपयांच्या एकूण प्रकल्प खर्चासह 9 प्रस्ताव.
या प्रकल्पांद्वारे 183.71 कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणूकीचा लाभ होणार असून 8260 लोकांना रोजगार मिळण्याची आणि 36000 शेतकर्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
उद्योजकांना क्लस्टर पध्दतीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एपीसीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या योजनेस पीएमकेएसवाय अंतर्गत दि. 03.05.2017 रोजी मान्यता देण्यात आली.
Jaydevi PS/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1698665)
आगंतुक पटल : 239