दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल व्यवहार सुरक्षित, खात्रीशीर आणि विश्वासार्ह होण्यासाठी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
दूरसंचार ग्राहकांचा छळवाद थांबविण्यासाठी कडक कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
Posted On:
15 FEB 2021 6:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021
मोबाईल फोनवर अवांछित संदेशांमुळे ग्राहकांची वाढती चिंता आणि चीडचीड, एसएमएसद्वारे वारंवार त्यांना होणारा त्रास, फसव्या कर्जाच्या व्यवहाराचे आश्वासन यावर चर्चा करण्यासाठी आणि विशेष म्हणजे डिजिटल व्यवहार सुरक्षित व सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि विधी न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सचिव (टेलिकॉम), सदस्य (टेलिकॉम) आणि डीडीजी (अक्सेस सर्व्हिस) देखील बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत, दूरसंचार ग्राहकांना गैर मार्गाने त्रास देणाऱ्या टेलिमार्केटर्स आणि व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दूरसंचार मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. छळण्याच्या पद्धतीमध्ये अवांछित व्यावसायिक संदेश किंवा कॉल यांचा समावेश आहे. आर्थिक फसवणूक करण्यासाठी आणि कष्टाने पैसे कमावणाऱ्या सामान्य माणसाची फसवणूक करण्यासाठी दूरसंचार संसाधने वापरली जात असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारच्या कृत्यांना त्वरित पायबंद घालण्यासाठी कडक व ठोस कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले की डू -नॉट डिस्टर्ब (डीएनडी) सेवेमध्ये नोंदणीकृत ग्राहकांना देखील नोंदणीकृत टेली-मार्केटर्स (आरटीएम) कडून व्यावसायिक मेसेज मिळत आहेत.
दूरसंचार मंत्र्यांनी दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांना दूरसंचार सेवा प्रदात्यांशी (टीएसपी) आणि टेल-मार्केटर्स यांच्याशी बैठक घेण्याचे निर्देश दिले ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य त्यांना अवगत व्हावे आणि यासंदर्भात घालून दिलेल्या नियम व प्रक्रियेची पूर्तता केली जावी. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्यास टेलिमार्केटर्स विरोधात आर्थिक दंड आकारण्याचा तसेच उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास सेवा खंडित करण्याचा प्रस्ताव होता.
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1698197)