राष्ट्रपती कार्यालय
पाच देशांच्या राजदूतांनी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपली नियुक्तीपत्रे राष्ट्रपती महोदयांना केली सादर
Posted On:
11 FEB 2021 5:32PM by PIB Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर आज पाच देशांचे राजदूत/वाणिज्यदूतांनी आपली नियुक्तीपत्रे सादर केली आणि राष्ट्रपतींनी त्यांचा स्वीकार केला. यात एल साल्वाडोर, पनामा, ट्युनिशिया, इंग्लंड आणि अर्जेन्टिना या देशांच्या राजदूतांचा समावेश होता.दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा समारंभ झाला. ज्या राजदूतांनी आपली नियुक्तीपत्रे सादर केलीत, त्यांची नावे खालीलप्रमाणे :-
1. H.E. श्री गुलेर्नो रुबिओ फ्युनेस - एल साल्वाडोरचे राजदूत.
2. H.E. श्रीमती यासिएल अलीनेस बुरीलो रिव्हेरा - पनामाच्या राजदूत
3. H.E. श्रीमती हयेत तल्बी - ट्युनिशियाच्या राजदूत
4. H.E. श्री एलीस - इंग्लंडचे राजदूत
5. H.E. Mr ह्युगो जेव्हीअर गोबी - अर्जेन्टिनाचे राजदूत
यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी सर्व राजदूतांचे त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. भारताचे या पाचही देशांशी मैत्रीचे आणि स्नेहाचे संबंध असून, जागतिक शांतता आणि समृद्धीच्या आपल्या समान ध्येयावरुन वाटचाल करतांना हे संबंध अधिकच दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला अस्थायी स्वरूपात सदस्य बनण्यासाठी पाठींबा दिल्याबद्दल त्यांनी या सर्व देशांचे आभार मानले.
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात एक निर्णायक आणि एकत्रित शक्ती उभी करुन या संकटावर मात करण्यात भारत जगातील आघाडीच्या देशांपैंकी एक ठरला आहे, असे राष्ट्रपती म्हणाले . सर्वांचे आरोग्यरक्षण आणि आर्थिक सौहार्द राखण्यात भारताचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले .केंद्र सरकारच्या लस मैत्री उपक्रमाअंतर्गत अनेक लसी थेट त्या देशांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. ‘जगाचे औषधभांडार’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताने आपली ही ओळख अधिकच ठळक केली आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
आपल्या निवेदनात या राजदूतांनी, त्यांच्या देशांच्या भारताशी असलेल्या भक्कम भागीदारीचा उल्लेख केला आणि आपापल्या देशातील नेतृत्वांचे प्रतिनिधी म्हणून हे संबंध अधिकच बळकट करण्याची कटिबद्धता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय समुदायाला कोविड-19 च्या लसींचा पुरवठा करण्याच्या भारताच्या भूमिकेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
***
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697138)
Visitor Counter : 263