आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत केवळ 26  दिवसांत 70 लाख लोकांचे लसीकरण करणारा भारत जगातला  सर्वात वेगवान देश ठरला आहे

Posted On: 11 FEB 2021 2:55PM by PIB Mumbai

 

आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी करून, कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत 70 लाखाहून अधिक लोंकाना लस देणारा  भारत जगातील सर्वात वेगवान देश बनला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001Y1QO.jpg

कोविड -19  विरुद्ध भारताची लढाई इतर आघाड्यांवरही दररोज यश मिळवून देत आहे. गेल्या 24 तासांत 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

 

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

3,413

2

Andhra Pradesh

3,35,268

3

Arunachal Pradesh

13,480

4

Assam

1,10,977

5

Bihar

4,30,307

6

Chandigarh

6,903

7

Chhattisgarh

2,16,784

8

Dadra & Nagar Haveli

2,326

9

Daman & Diu

1,030

10

Delhi

1,46,789

11

Goa

9,961

12

Gujarat

6,14,530

13

Haryana

1,83,529

14

Himachal Pradesh

66,101

15

Jammu & Kashmir

74,219

16

Jharkhand

1,60,492

17

Karnataka

4,64,485

18

Kerala

3,26,246

19

Ladakh

2,536

20

Lakshadweep

920

21

Madhya Pradesh

4,31,702

22

Maharashtra

5,73,681

23

Manipur

13,747

24

Meghalaya

9,760

25

Mizoram

11,046

26

Nagaland

7,167

27

Odisha

3,61,623

28

Puducherry

4,770

29

Punjab

91,669

30

Rajasthan

5,59,990

31

Sikkim

7,808

32

Tamil Nadu

1,97,392

33

Telangana

2,58,122

34

Tripura

52,908

35

Uttar Pradesh

6,73,542

36

Uttarakhand

90,483

37

West Bengal

4,27,042

38

Miscellaneous

74,366

Total

70,17,114

गेल्या 24 तासांत देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,42,562 इतकी  नोंदली गेली आहे. . देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण एकूण बाधित संख्येच्या आता फक्त 1.31 टक्के आहे.  प्रति दशलक्ष लोकसंख्येमध्ये भारताची सक्रिय रुग्णसंख्या (104) जगातील सर्वात कमी संख्येपैकी एक आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002Y6JT.jpg

गेल्या 24 तासांत देशात 12,923 नवीन रुग्णांची नोंद झाली. याच कालावधीत 11,764 रुग्ण बरे झाले.

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर (97.26%) असून  जागतिक स्तरावरील सर्वोच्च दरापैकी एक आहे.

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  1,05,73,372 आहे.  सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील  अंतर निरंतर वाढत आहे आणि सध्या 1,04,30,810 इतके आहे.

बरे झालेल्या कोविड -19 बाधित  रुग्णांपैकी  83.20% रुग्ण 6 राज्यांत आहेत.  केरळमध्ये सर्वाधिक (5,745) रुग्ण बरे झाले असून, त्याखालोखाल  महाराष्ट्र (2,421) आणि गुजरात (495) आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0031LK1.jpg

केरळमध्ये काल  5,980 नवीन रुग्ण आढळले आहेत . त्याखालोखाल महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अनुक्रमे 3,451 आणि  479 नवीन रुग्ण आढळले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004YVHW.jpg

महाराष्ट्रात काल सर्वाधिक  30 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल  केरळमध्ये  18  मृत्यूंची नोंद झाली

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006PQ2K.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007Z1FZ.jpg

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697072) Visitor Counter : 280