पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेतील पीडितांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदत
Posted On:
07 FEB 2021 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021
उत्तराखंडमधील चामोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदतही पंतप्रधानांनी मंजूर केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी @narendramodi यांनी उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदतही मंजूर केली आहे.” असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर वर सांगितले आहे.
* * *
Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696036)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam