कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोविडनंतरच्या काळाशी अर्थसंकल्प सुसंगत-केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे प्रतिपादन
Posted On:
02 FEB 2021 4:53PM by PIB Mumbai
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग पूर्वोत्तर राज्य विकास (DoNER) यांनी अर्थसंकल्पावर माध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्या मालिकेत अर्थसंकल्प भारताच्या कोविडनंतरच्या काळाच्या द्रुष्टीशी सुसंगत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की हा जरी आर्थिक दस्तावेज असला तरीही अर्थसंकल्पाचा आत्मा हा अर्थशास्त्राच्या क्षेत्राच्या पुढे जात मोदिजींच्या नेतृत्वाखालील भारत जो जगातील सर्व देशांच्या समूहात अग्रभागी सदस्य म्हणून समोर येण्याच्या जो मार्ग निश्चित झाला आहे, त्याचा नकाशा आहे.

ते म्हणाले, की अनेक भाष्यकारांनी जो अंदाज व्यक्त केला होता, की सामान्य जनतेवर अधिक ओझे किंवा जबाबदारी येईल, परंतु अर्थसंकल्प 2021-22 हा कोविड महामारीच्या दडपणाशी सामना करणाऱ्या देशाला दिलासादायक ठरला आहे.
या अर्थसंकल्पाने दिलेल्या प्राधान्यक्रमाचा जगातील इतर देशांनीही आदर्श ठेवायला हवा, असेही डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले.उदाहरणार्थ आरोग्य क्षेत्राला दिलेले उच्च प्राधान्य,हे अपूर्व आहे एवढेच नव्हे तर त्यामुळे भारताचा स्वबळावरील विश्वास वाढवेल आणि भारताला इतरांपेक्षा पुढे नेत, कोरोना लसीसारख्या सरकारने देशात सुरू केलेल्या मोठ्या उपक्रमात ज्या सरकारने शारीरिक स्वास्थ, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि निरामय जीवन हे महत्त्वाचे मानले, त्यांना पुढे घेऊन जाईल.
तपशीलवार बातमीसाठी कृपया येथे क्लिक करा
M.Iyengar/S.Patgoankar/P.Kor
(Release ID: 1694449)