अर्थ मंत्रालय
दारिद्र्य निर्मूलनासाठी भारताने आर्थिक विकासावर सातत्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे- आर्थिक सर्वेक्षण-2020-21
Posted On:
29 JAN 2021 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2021
केंद्रिय अर्थ आणि कॉर्पोरेट कार्य मंत्री श्रीमती.निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण २०२०-२१ सादर करताना आर्थिक विकासावर स्पष्टपणे जोर देताना सांगितले की, भारताचा विकासाचा टप्पा पाहता, भारताला समग्र भागीदारी वाढवून गरिबांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक विकासावर सातत्याने लक्ष केंद्रित करायला हवे.
आर्थिक सर्वेक्षणात सांगितले आहे की,एकीकडे असमानता आणि सामाजिक आर्थिक परिणाम आणि दुसरीकडे आर्थिक विकास आणि सामाजिक आर्थिक परिणाम यांच्यामधील भारतातील संबंध विकसित अर्थव्यवस्थांमध्ये आढळलेल्या निष्कर्षांपेक्षा वेगळा आहे.
विकसित देशांच्या तुलनेत भारतात आर्थिक विकास आणि असामनतेचा संबंध सामाजिक आर्थिक निर्देशकावर त्याच्या परिणामांच्या स्वरूपात वेगळा आहे.
राज्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, आयुर्मान, बालमृत्यू, जन्म आणि मृत्यू दर, प्रजनन दर, गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा वापर आणि मानसिक आरोग्यासह विविध सामाजिक आर्थिक निर्देशांकांसोबत असमानता आणि दरडोई उत्पन्नाच्या परस्पर संबंधांचे परीक्षण करून आर्थिक सर्वेक्षण याा निष्कर्षांपर्यंत पोहोचले आहे.
हे विश्लेषण दर्शवते की, आर्थिक विकास आणि असमानता या दोन्ही गोष्टींचे सामाजिक आर्थिक निर्देशकांशी समान संबंध आहेत.या विश्लेषणाच्या आधारावर 2020-21 च्या आर्थिक सर्वेक्षणात भारतात असे आढळून आले आहे की, "भारतात आर्थिक विकासावर असमानतेपेक्षा दारिद्र्य निर्मूलनाचा अधिक प्रभाव पडतो."आर्थिक विकासाला राज्य स्तरावर दरडोई उत्पन्न वाढ दर्शविण्यात आली आहे.
आर्थिक सर्वेक्षण 2020-21 हे दर्शवते की, उच्च आर्थिक विकासामुळे भारत आणि चीन मधल्या गरीबीत लक्षणीय घट झाल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, आर्थिक विकासाच्या धोरणावर लक्ष केंद्रित केल्याचा अर्थ असा नाही की, पुनर्वितरीत उद्दिष्ट महत्वहीन आहेत. मात्र आर्थिक भागीदारीचा आकार वाढला तरच विकसनशील अर्थव्यवस्थेत पुनर्वितरण व्यवहार्य आहे.
थोडक्यात, भारतासारख्या विकसनशील देशासाठी आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये अशी शिफारस आहे की, जिथे विकासाची क्षमता अधिक आहे आणि दारिद्र्य निर्मूलनाची संधीही महत्वपूर्ण आहे तिथे निकटच्या भविष्यात आर्थिक भागीदारीचा आकार वाढवण्यासाठी सातत्याने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693309)
Visitor Counter : 537