पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान करणार 125 व्या प्रबुद्ध भारत वर्धापन दिनाच्या सोहळ्याला 31 जानेवारीला संबोधित

Posted On: 29 JAN 2021 4:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रबुद्ध भारत,या स्वामी विवेकानंद यांनी 1896 साली  सुरू केलेल्या रामकृष्ण मठाच्या नियतकालिकाच्या 125 व्या वर्धापन दिन सोहळ्याला दिनांक 31 जानेवारी 2021रोजी दुपारी 3:15 वाजता संबोधित करणार आहेत. या समारंभाचे आयोजन  अद्वैत आश्रमाने  केले आहे.

 

प्रबुद्ध भारत संबंधी:

प्रबुद्ध भारत ही  पत्रिका भारताच्या प्राचीन अध्यात्मिक ज्ञानाचा  प्रसार करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. त्याचे  प्रकाशन प्रथम चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथून सुरू झाले, तेथून ते दोन वर्षे प्रकाशित केले गेले, त्यानंतर ते अल्मोरा येथून प्रकाशित होत राहिले. काही दिवसांनंतर एप्रिल 1899मध्ये या पत्रिकेच्या प्रकाशनाची जागा अद्वैत आश्रम येथे हलविण्यात आली आणि तेथून ते आजतागायत प्रकाशित होत आहे.

काही महनीय व्यक्तीनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, तत्वज्ञान इतिहास, मानसशास्त्र, कला आणि इतर सामाजिक विषयांवर लिखाण करून प्रबुद्ध भारतवर  आपल्या लिखाणाचा ठसा उमटवला आहे.नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, सिस्टर निवेदिता, अरबिंदो, माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन अशा  तेज:पुंज व्यक्तींनी या पत्रिकेत लेखन सहभाग घेतला होता.

अद्वैत आश्रम संपूर्ण प्रबुद्ध भारत संग्रह आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे.

 

* * *

G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1693263) Visitor Counter : 221