शिक्षण मंत्रालय
कला उत्सव 2020 च्या समारोप सोहोळ्यात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे संबोधन
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज कला उत्सव 2020 च्या समारोप सोहळ्यास संबोधित केले
Posted On:
28 JAN 2021 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला योग्य दिशा व आकार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीची जाणीव हा कला उत्सव करून देतो असे पोखरियाल यावेळी म्हणाले. कला उत्सव 2020 मध्ये देशी खेळणी व खेळ विभाग सुरू केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले आणि यातून व्होकल फॉर लोकल ला चालना मिळते असे त्यांनी सांगितले .
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये कला आणि संस्कृतीच्या संवर्धनावर भर देण्यात आला आहे.कला उत्सव 2020 मध्ये ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या शिफारशींचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची कला आत्मसात करत असताना आपल्या कल्पनाशक्तीने त्याचे आकलन करून ती साकारतात आणि अशा प्रकारे ती प्रत्यक्षात आणतात. कला उत्सव या प्रक्रियेस संधी देतो. अशा संधी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असून त्या विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, आकलनक्षमता, समस्येचे निराकरण, संज्ञानात्मक आणि निर्णायक क्षमता वाढवतात असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
या वर्षीच्या कोविद महामारीच्या परिस्थितीत काही महिन्यांपूर्वीपर्यंत अशक्यप्राय वाटणारे हे आकर्षक सादरीकरण केल्याबद्दल पोखरीयाल यांनी सर्व सहभागी कलाकार आणि संयोजकांचे अभिनंदन केले.
कला उत्सव 2020 बद्दलः
कला उत्सव 2020 डिजिटल मंचाद्वारे 10 जानेवारी 2021 रोजी ऑनलाइन सुरू करण्यात आला. कला उत्सव 2020 मध्ये विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समितीच्या एकूण 35 संघांनी भाग घेतला आणि 576 विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले. कला उत्सव 2020 मध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी 287 मुली आणि 289 मुलगे आणि चार दिव्यांग होते.
11 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित केलेल्या कला उत्सव 2020 च्या स्पर्धांमध्ये सामील एकूण नऊ कला प्रकार होते.
1.शास्त्रीय गायन 2. पारंपारिक लोकगीते 3. शास्त्रीय वाद्ये 4. पारंपरिक / लोक वाद्ये 5. शास्त्रीय नृत्य 6. लोक नृत्य 7. व्हिज्युअल आर्ट्स (द्विमितीय) 8. व्हिज्युअल आर्ट्स (त्रिमितीय) 9. स्थानिक खेळ-खेळणी.
कला उत्सव 2020 चे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Jaydevi P.S/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692974)