ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

पूर्वोत्तर राज्ये पर्यटकांचे आणि व्यापाराचे लोकप्रिय स्थान होणार: डॉ. जितेंद्र सिंग

प्रविष्टि तिथि: 24 JAN 2021 7:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिनांक 23 जानेवारी 2021रोजी 69 व्या ईशान्य परिषदेचे उदघाटन केले.  ती आज संपन्न झाली.

या दोन दिवसीय एनईसी प्लेनरीमधे ईशान्य विभागातील सर्वांगीण विकास योजनांवर भर देण्यात आला  आणि या भागात राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. गुंतवणूकीत वृध्दी करत आणि इझ ऑफ डुईंग बिझनेस याच्या क्रमवारीत सुधारणा करण्यावरही प्रामुख्याने यावेळी चर्चा करण्यात आली. विविध तंत्रज्ञान सत्रांत उपजिवीकेशी संबंधित विकास योजनाउद्योजकता ,पायाभूत सुविधा, दळणवळण आणि इतर संबंधित विकासात्मक प्रकल्प हा चर्चेचा केंद्रबिंदू होता.

केंद्रीय पूर्वोत्तर विकास, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतरीक्ष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)डॉ. जितेंद्र सिंग   यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाच्या आणि त्यांना इतर विकसित राज्यांच्या पातळीवर आणण्याच्या दृष्टीचा पुनरूच्चार उदघाटनाच्यावेळी केला.

***

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1691967) आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Assamese , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu