गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली


संपूर्ण राष्ट्र नेताजींच्या पराक्रम आणि अदम्य लढाऊ वृत्तीसाठी नेहमी ऋणी राहील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींची जयंती 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करून अभूतपूर्व आदरांजली अर्पण केली आहे

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2021 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. अमित शाह यांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे नेताजींच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केले आणि स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

Image

या प्रसंगी, केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, सुभाष बाबू एक बुद्धिमान विद्यार्थी होते, जन्मजात देशभक्त, कौशल्यपूर्ण प्रशासक आणि संघटक आणि असामान्य लढाऊ वृत्ती असलेला नेता होते.

Image

अमित शाह म्हणाले की, संपूर्ण राष्ट्र हे नेताजींच्या पराक्रम आणि अविरत संघर्षासाठी नेहमीच ऋणी राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींना त्यांच्या जयंतीनिमित्त 'पराक्रम दिवस' साजरा करून एक अभूतपूर्व आदरांजली अर्पण केली आहे. एक सामर्थ्यवान दिवस म्हणून, सर्व देशवासीयांना माझ्या वतीने या पराक्रम दिनाच्या शुभेच्छा आहेत. नेताजींचे योगदान देशवासीयांना दीर्घकाळ स्मरणात रहावे, यासाठी देशभरात सुभाष बाबूंची 125 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी केली जाईल, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी सांगितले.


* * *

S.Tupe/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1691620) आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada