आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियानाच्या 6 व्या दिवसापर्यंत 10.5 लाख लाभार्थींचे लसीकरण


भारतातल्या चाचण्यांच्या संख्येत वाढ होत एकूण संख्या पोहोचली 19 कोटी वर

Posted On: 22 JAN 2021 12:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021

 

जागतिक महामारीच्या विरोधातल्या एकत्रित आणि निर्धारपूर्वक लढ्यात भारताने महत्वाचा टप्पा गाठला आहे.

22 जानेवारी 2021 ला सकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 10.5 लाख (10,43,534)  लाभार्थींनी  देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियाना अंतर्गत लस घेतली.

गेल्या 24 तासात 4,049 सत्रात, 2,37,050  जणांनी लस घेतली. आतापर्यंत 18,167 सत्रे झाली आहेत.

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

1,032

2

Andhra Pradesh

1,15,365

3

Arunachal Pradesh

4,682

4

Assam

10,676

5

Bihar

63,541

6

Chandigarh

753

7

Chhattisgarh

22,171

8

Dadra & Nagar Haveli

184

9

Daman & Diu

94

10

Delhi

18,844

11

Goa

426

12

Gujarat

34,865

13

Haryana

45,893

14

Himachal Pradesh

5,790

15

Jammu & Kashmir

6,847

16

Jharkhand

11,641

17

Karnataka

1,38,807

18

Kerala

35,173

19

Ladakh

240

20

Lakshadweep

369

21

Madhya Pradesh

38,278

22

Maharashtra

52,393

23

Manipur

1,454

24

Meghalaya

1,785

25

Mizoram

2,537

26

Nagaland

3,187

27

Odisha

1,13,623

28

Puducherry

759

29

Punjab

12,532

30

Rajasthan

32,379

31

Sikkim

773

32

Tamil Nadu

42,947

33

Telangana

97,087

34

Tripura

9,272

35

Uttar Pradesh

22,644

36

Uttarakhand

8,206

37

West Bengal

53,988

38

Miscellaneous

32,297

Total

10,43,534

चाचण्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. चाचण्यांसंदर्भातल्या पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे जागतिक महामारी विरोधातल्या लढ्याला चालना मिळाली आहे. एकूण चाचण्या 19 कोटी पेक्षा अधिक झाल्या आहेत.

गेल्या 24 तासात 8,00,242 चाचण्या झाल्या असून भारतातल्या एकूण चाचण्यांची संख्या 19,01,48,024 इतकी झाली आहे.

समावेशक आणि व्यापक चाचण्यांमुळे पॉझीटीव्हीटी दर कमी झाला आहे.  हा दर आज 5.59%  इतका आहे.

गेल्या आठवड्यांपासून सुरु असलेला कल जारी राखत, सक्रीय रुग्ण,  एकूण सक्रीय रुग्णांच्या 1.78%  आहेत. भारतात सध्या  1,88,688 सक्रीय रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात देशात 18,002 रुग्ण बरे झाले.यामुळे गेल्या 24 तासात  एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत 3,620 ने घट झाली.

देशात बरे झालेल्यांची एकूण  संख्या 10,283,708 झाली  असून बरे झालेले आणि  सक्रीय रुग्ण यामधले अंतर 1,00,95,020 (54.5  पट) झाले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 96.78% झाला आहे.

बरे झालेल्या पैकी 84.70% हे 10   राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 6,229 जण कोरोनामुक्त झाले महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3,980 तर  कर्नाटकमध्ये 815 जण बरे झाले.

गेल्या 24 तासात 14,545 नव्या पॉझीटीव्ह  रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 84.14% रुग्ण  आठ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये  दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 6,334 नवे  रुग्ण आढळले, महाराष्ट्रात 2,886 आणि कर्नाटकमध्ये 674  नव्या रुग्णांची काल नोंद झाली.

गेल्या 24 तासातल्या  163   मृत्यूंपैकी  82.82% मृत्यू  9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रात 52   मृत्यूंची नोंद झाली. केरळमध्ये 21 मृत्यूंची नोंद झाली.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691161) Visitor Counter : 192