पंतप्रधान कार्यालय

मोदी-सरकारच्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजनेचा उत्तर प्रदेशातील जनतेला फायदा झाला

Posted On: 20 JAN 2021 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021

 

सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजना गतिमान झाली असून उत्तर प्रदेशातील गरीबांतील  गरीबांना त्याचा फायदा झाला आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजना - ग्रामीण योजनेअंतर्गत उत्तरप्रदेश मधील 6 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत जारी केल्यानंतर ते बोलत होते.

 

पंतप्रधानांनी असे ठामपणे सांगितले की आत्मनिर्भर भारत  हा थेट देशातील नागरिकांच्या आत्मविश्वासाशी जोडलेला आहे आणि स्वतःचे घर हे आत्मविश्वास वाढवते. स्वतःच्या मालकीचे घर आयुष्याला आश्वस्त करते आणि दारिद्र्यातून मुक्त होण्याची आशा देखील पल्लवित करते.

मागील सरकारांच्या काळात गरिबांना घर बांधण्यात सरकारकडून मदत मिळण्याचा आत्मविश्वास नव्हता याचे स्मरण पंतप्रधानांनी करून दिले. पूर्वीच्या योजनेत बनवलेल्या घरांची गुणवत्ताही परिपूर्ण नव्हती असे ते म्हणाले. गरिबांना चुकीच्या धोरणांचा फटका सहन करावा लागला, असे पंतप्रधान म्हणाले. ही दुर्दशा लक्षात ठेवून स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येक गरीब कुटुंबाला घर मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली गेली. अलिकडच्या वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत 1.25 कोटी घरांचे उद्दिष्ट असून त्यात केंद्र सरकारचे 1.5 लाख कोटी रुपयांचे योगदान आहे. राज्यात मागील सरकारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. उत्तर प्रदेशात 22 लाख ग्रामीण घरे बांधली जाणार असून त्यातील 21.5 लाख घरांना बांधकामाची परवानगी मिळाली आहे. सध्याच्या सरकारी कारभारात 14.5 लाख कुटुंबांना आधीच घरे मिळाली आहेत.

 

* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690458) Visitor Counter : 211