पंतप्रधान कार्यालय
गुरु गोविंदसिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांचे नमन
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2021 11:45AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021
गुरु गोविंदसिंग जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पावन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना नमन केले.
“गुरु गोविंदसिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त मी त्यांना वंदन करतो. न्यायप्रिय आणि सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले. त्यांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहताना ते कधी विचलित झाले नाहीत.
त्यांचे धैर्य आणि त्यागसुद्धा आपल्या स्मरणात आहे.
आमच्या सरकारच्या कार्यकाळात गुरू गोविंदसिंग जी यांचे 350 वे प्रकाश पर्व आल्याने गुरू साहिबांची माझ्यावर विशेष कृपा आहे. मला पाटण्यातील भव्य उत्सव आठवतो, जिथे मला जाण्याची आणि माझा आदरभाव व्यक्त करण्याची संधी देखील मिळाली होती." अशा शब्दात पंतप्रधानांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
* * *
U.Ujgare/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1690260)
आगंतुक पटल : 205
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam