आदिवासी विकास मंत्रालय

ई-गव्हर्नन्ससाठी आदिवासी विकास मंत्रालयाला देण्यात येणारा स्कॉच चॅलेन्जर पुरस्कार केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आभासी कार्यक्रमाद्वारे स्वीकारणार

Posted On: 15 JAN 2021 5:43PM by PIB Mumbai

 

माहिती तंत्रज्ञानावर आधारित तसेच इतर परिवर्तनात्मक उपक्रमांमुळे कामगिरीत झालेल्या सुधारणेबद्दल आदिवासी विकास मंत्रालयाला ई-गव्हर्नन्ससाठी देण्यात येणारा स्कॉच चॅलेन्जर पुरस्कार उद्या केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा आभासी कार्यक्रमाद्वारे स्वीकारणार आहेत.

यावेळी आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर उपस्थित राहतील.

आदिवासी विकास मंत्रालयाने अलीकडेच अनेक परिवर्तनात्मक उपक्रम हाती घेतले आहेत. कागदरहित कार्यालय, माहिती मिळविण्यावर देखरेख, राज्यांमधील संवादासाठी ऑनलाइन अहवाल, यासारख्या प्रक्रियांचे डिजिटलकरण करण्यात आले आहे आणि ते विश्लेषक आधारित असून परफॉरमन्स डॅशबोर्डला रिअल टाइम आधारावर अद्ययावत केले जाते. परफॉर्मन्स डॅशबोर्ड, प्रयास-पीएमओ डॅशबोर्ड, नीती आयोग आणि थेट लाभ हस्तांतरण अभियान यासारख्या सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध आदिवासींशी संबंधित माहितीमध्ये पारदर्शकता आहे.

धोरण बनविणे आणि कृती करण्याच्या आपल्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाला आहे. तसेच, परिवर्तनात्मक बदलांसाठी आम्ही डिजिटल मार्ग अवलंबत आहोत जो पारदर्शकता आणि गती सुनिश्चित करेल असे अर्जुन मुंडा म्हणाले.

आदिवासी विकास मंत्रालयाने शिष्यवृत्ती जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटलीकरण केले आहे.

थेट लाभ हस्तांतरण अभियायासंदर्भातील आदेशामुळे सर्व पाच शिष्यवृत्ती योजनांचे डिजीटलीकरण करण्यात आले आहे. 13 योजना मंत्रालयाच्या डॅशबोर्डवर असून 6 उपक्रम हे प्रयास पीएमओ डॅशबोर्डवर आहेत. संपूर्ण शिष्यवृत्ती प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे 64 लाख लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात डीबीटीमार्फत शिष्यवृत्ती मिळू शकेल. आदिवासी विकास मंत्रालयाच्या पीएम डॅशबोर्ड आणि डीबीटी डॅशबोर्डवर उपलब्ध माहिती पारदर्शकतेत भर घालत आहे.

हवामान बदलांमुळे पाणी टंचाई निर्माण होणार्‍या लडाख भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बर्फाचा-स्तूप हा एक अनोखा प्रकल्प आहे. हिवाळ्यात गोठवून वितळलेले पाणी साठवण्याचा हा एक मार्ग आहे जो पेरणीच्या हंगामात वापरला जाऊ शकतो. या संरचनेत पाणी धारण करण्याची क्षमता अधिक असलेल्या स्थानिक साहित्याचा समावेश असून तो स्तूपासारखा दिसतो. 2019-20 मध्ये अशा प्रकारच्या 26 बर्फाच्या-स्तूपांची स्थापना केली गेली होती, ज्यात सुमारे 60 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता.

तसेच आरोग्य पोर्टलद्वारे भारतातील आदिवासींच्या आरोग्य आणि पोषणाची स्थिती एकाच ठिकाणी प्राप्त होते.

 

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688827) Visitor Counter : 169