पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान येत्या 16 जानेवारीला स्टार्ट अप्सशी संवाद साधणार आणि 'प्रारंभ' या भारतीय आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप्स शिखर परीषदेला संबोधित करणार

Posted On: 14 JAN 2021 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता स्टार्ट अप्सशी संवाद साधणार आहेत आणि 'प्रारंभ' या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप्सच्या शिखर परीषदेला व्हिडिओ कॉन्‍फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत.

ही परीषद वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने येत्या 15-16 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली आहे. ऑगस्ट 2019 ला काठमांडू येथे झालेल्या चौथ्या बिमस्टेक परीषदेत पंतप्रधानांनी बिमस्टेक स्टार्ट अप्स कॉनक्लेव्हचे यजमानपद भूषविण्याचे जाहीर केले होते, या घोषणेचा पाठपुरावा करण्यासाठी ही दोन दिवसीय परीषद आयोजित करण्यात येत आहे.

पंतप्रधानांनी  16  जानेवारी 2016 रोजी स्टार्ट अप उपक्रमाचा आरंभ केला होता त्याचा हा पाचवा वर्धापनदिन आहे. 25 हून अधिक देश आणि 200पेक्षा जास्त वक्त्यांचा यात सहभागअसेल आणि भारत सरकारने स्टार्ट अप उपक्रम सुरू केल्या पासून  भारत सरकारच्या वतीने आयोजित होणारा हा सर्वात मोठा स्टार्ट अप्सचा मेळावा असेल. या उपक्रमात एकूण 24 सत्रे असतील, ज्याचे उद्दिष्ट बहुपक्षीय सहकार्य वाढविणे आणि जगभरातील विविध देशांनी एकत्र येऊन स्टार्ट अप्सच्या वातावरणाचा विकास आणि सबलीकरण करणे हे आहे.

 

* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688597) Visitor Counter : 205