सांस्कृतिक मंत्रालय
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2021 1:32PM by PIB Mumbai
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचा उत्सव साजेशा पद्धतीने साजरा करण्यासठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना आज जारी करण्यात आली.
ही उच्चस्तरीय समिती 23 जानेवारी 2021 पासून एक वर्षासाठी स्मारकासाठीच्या उपक्रमांवर निर्णय घेईल. या समितीमधील सदस्यांमध्ये प्रतिष्ठित नागरिक, इतिहासाचे अभ्यासक, लेखक, तज्ज्ञ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच आझाद हिंद सेनेशी संबंधित (आयएनए) ख्यातनाम व्यक्तींचा समावेश असेल. ही समिती दिल्ली, कोलकाता आणि नेताजी आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित इतर ठिकाणी तसेच परदेशातही स्मारकाच्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन करेल.
उच्चस्तरीय समितीच्या राजपत्रित अधिसूचनांसाठी येथे क्लिक करा
.....
S.Mhatre/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1687276)
आगंतुक पटल : 265
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam