रेल्वे मंत्रालय

उद्योग सुलभतेमुळे रेल्वेला भरीव प्रोत्साहन


मालवाहतूक ग्राहकांची गरज ओळखून ‘एक थांबा- एकल खिडकी’ मालवाहतूक व्यवसाय विकास पोर्टलची निर्मिती

Posted On: 05 JAN 2021 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2021

 

देशामध्ये मालवाहतूक क्षेत्रामध्ये भारतीय रेल्वे अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे. 2020 या वर्षात जास्तीत जास्त काळ लॉकडाउनमध्ये गेला, अशा अतिशय महत्वाच्या काळामध्ये भारतीय रेल्वेने संपूर्ण देशभरामध्ये मालवाहतूक यंत्रणा अतिशय अथक सुरू ठेवून अन्नधान्य, औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवला. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या वर्ष 2020 च्या शेवटच्या चार महिन्यात रेल्वेने मालवाहतुकीमध्ये सातत्याने विक्रम नवे नोंदवले.

आपल्या पारंपरिक क्षेत्रामध्ये कार्य करतानाच नवीन ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी ग्राहक केंद्रीत दृष्टिकोण भारतीय रेल्वेने विकसित केला आणि ‘फ्रेट ऑन प्रायोरिटी’ धोरण स्वीकारले. 

ग्राहकांना सेवा देताना नवीन उंची प्रदान करण्याच्या वचनबद्धतेतून रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न तसेच सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज मालवाहतूक व्यवयाय विकास पोर्टलचा प्रारंभ केला. या पोर्टलच्या माध्यमातून रेल्वेच्या मालवाहतूक ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावरून या पोर्टलच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

यासाठी https://indianrailways.gov.in/# अथवा https://www.fois.indianrail.gov.in/RailSAHAY या संकेत स्थळांचा वापर करता येणार आहे. 

या नवीन पोर्टलच्या माध्यमातून मानवी हस्तक्षेप टाळून व्यवसायाच्या गरजांची पूर्तता करण्यावर भर देवून त्याप्रमाणे सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. व्यवसाय सुलभता आणि व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ग्राहकांच्या गरजांचा लक्षात घेण्यात आल्या आहेत. 

या पोर्टलचे ग्राहकांना होणारे लाभ - 

  1. नवीन ग्राहक - रेल्वेसाठी संभाव्य नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या मालाची वाहतूक रेल्वेने करणे कसे लाभदायक आहे, याची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत असून त्यांचा मालाला कोणता मार्ग योग्य ठरणार आहे, हेही सूचविण्यात येते. 
  2. विद्यमान ग्राहक - रेल्वेव्दारे आधीपासूनच जे माल पाठवतात, त्यांच्याही या पोर्टलवर नवीन सुविधा दिल्या आहेत. यामध्ये सर्वोत्कष्ट सेवा देणे, व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक आणि महत्वाची माहिती प्रदान करणे, त्यांच्या व्यवसायातल्या घडामोडी, देखरेख आणि विस्तार यासाठी महत्वाची भूमिका बजावणे, मालवाहतूक व्यवसाय पोर्टलचा वैयक्तिक डॅशबोर्ड उपलब्ध करून त्यांना एका दृष्टिक्षेपामध्ये मालवाहतुकीची माहिती उपलब्ध करून देण्याची सुविधा, तसेच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण व्यवसाय चालविण्यास मदत करणे, जीआयएसव्दारे जर एखाद्या ठिकाणी माल पोहोचत नसेल तर माहिती देणे, विविध सेवांसाठी एका क्लिकव्दारे काम, सेवेमध्ये सवलत, पूर्वआराक्षण सुविधा. 
  3. वस्तू पृष्ठ - या पोर्टलवर मालवाहतूक केल्या जाणा-या वस्तूनियाह काम करणे शक्य होणार आहे. त्यासाठी कोळसा, खनिज आणि धातू, अन्नधान्य, मैदा आणि डाळी, सिमेंट आणि खडी, रासायनिक खते, लोखंड आणि स्टील, पेट्रोलियम उत्पादने, कंटेनर सेवा, स्वयंचलित वाहने आणि इतर अशा प्रकारे वेगवेगळ्या मालासाठी स्वतंत्र पृष्ठे तयार करण्यात आली आहेत. 
  4. पुरवठा भागीदार - संपूर्ण देशभरामध्ये मालवाहतूक करण्यासाठी संबंधित भागीदारांनी पुढे यावे, असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. यामध्ये खाजगी गुंतवणूकदार म्हणून कार्य करावे, खाजगी मालवाहू टर्मिनल किंवा स्वतःचे रेल्वे मालवाहू शेड तयार करून पुरवठा साखळीचा भाग बनावे, असाही पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

डिसेंबर 2020 मध्ये भारतीय रेल्वेने 118.13 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. ही वाहतूक गेल्यावर्षीच्या याच काळापेक्षा 8.54 टक्के जास्त आहे. (डिसेंबर 2019 मध्ये रेल्वेने 108.84 दशलक्ष टन माल वाहून नेला होता) या काळामध्ये रेल्वेने मालवाहतुकीतून 11788.11 कोटी रुपयांची कमाई केले. गेल्यावर्षी डिसेंबर 2019 मध्ये रेल्वेने मालवाहतूक करून 11030.37 कोटी रूपये उत्पन्न मिळवले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेने  मालवाहतूक करून 757.74 कोटी रूपये(6.87 टक्के) जास्त उत्पन्न मिळवले आहे. 


* * *


M.Iyengar/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686323) Visitor Counter : 201