भूविज्ञान मंत्रालय

अंटार्क्टिकासाठी 40 वी भारतीय वैज्ञानिक मोहीम सुरू

Posted On: 04 JAN 2021 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021

भारताने आज अंटार्क्टिकासाठी 40 वी वैज्ञानिक मोहीम सुरू केली. ही भारतीय मोहीम देशाच्या चार दशकांच्या दक्षिणेकडील बर्फाळ प्रदेशातील वैज्ञानिक प्रयत्नांचे प्रतिक आहे. या 40 व्या मोहिमेचा प्रवास 5 जानेवारी 2021 रोजी गोव्याहून 43 सदस्यांसह सुरु होईल. चार्टर्ड आईस-दर्जाचे एमव्ही वॅसिली गोलोव्हिन हे जहाज 30 दिवसांचा प्रवास करून अंटार्क्टिकाला पोहोचेल. 40 सदस्यांची एक टीम तिथे सोडल्यानंतर हे जहाज एप्रिल 2021 मध्ये भारतात परत येईल. परत येताना हे जहाज मागील फेरीतील चमूला परत घेऊन येईल.

भारतीय अंटार्क्टिक मोहिमेस 1981 मध्ये सुरुवात झाली. पहिल्या फेरीमध्ये डॉ. एसझेड कासिम यांच्या नेतृत्वात 21 वैज्ञानिक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या पथकाचा समावेश होता. या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर, भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमाने आता अंटार्क्टिकामध्ये दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती अशी तीन कायमस्वरूपी संशोधन केंद्रे उभारली आहेत. आजपर्यंत, अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारती अशी दोन कार्यान्वित संशोधन केंद्रे आहेत. नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च (एनसीपीओआर), गोवा, संपूर्ण भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते.

सध्या सुरु असलेल्या कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्‌भवलेल्या आव्हानांमुळे 40 व्या भारतीय अंटार्क्टिक मोहिमेच्या वैज्ञानिक आणि लॉजिस्टिक कामांना काही मर्यादा आल्या आहेत. हवामान बदल, भूगर्भशास्त्र, समुद्रातील निरिक्षण, विद्युत व चुंबकीय प्रवाह मोजमाप, पर्यावरणीय देखरेखीसाठी चालू असलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांना पाठबळ देण्यावर भर दिला आहे; अन्न, इंधन, तरतुदी आणि अतिरिक्त वस्तूंचे पुनर्वसन; आणि हिवाळ्यातील चमूला परत आणण्यावर भर दिला आहे.  अंटार्क्टिका खंड नेहमीच कोविड-19 मुक्त राखण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1686141) Visitor Counter : 885