आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

ब्रिटनमधून आलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत अद्ययावत माहिती

एकूण बाधितांची संख्या 38

Posted On: 04 JAN 2021 4:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021

 

नवीन ब्रिटन व्हेरिएंट जीनोमसह एकूण 38 जण संक्रमित झाल्याचे आढळले आहे.

एनआयएमएचएएनएस, बंगळुरुमध्ये 10, हैदराबाद,सीसीएमबीमध्ये 3, एनआयव्ही,पुणेमध्ये 5, आयजीआयबी, दिल्लीमध्ये 11, एनसीडीसी, नवी दिल्लीत 8  आणि एनसीबीजी, कोलकाता मध्ये 1 रुग्ण आढळला आहे.

एनसीबीएस, InSTEM, बंगळूरू, सीडीएफडी हैदराबाद, आयएलएस भुवनेश्वर आणि एनसीसीएस पुणे यांना आतापर्यंत ब्रिटन म्युटंट विषाणू सापडलेला नाही.

No.

Institute/Lab

Under

Persons detected with new COVID strain

1

NCDC New Delhi

MoHFW

8

2

IGIB New Delhi

CSIR

11

3

NCBG Kalyani (Kolkata)

DBT

1

4

NIV Pune

ICMR

5

5

CCMB Hyderabad

 

CSIR

3

6

NIMHANS Bengaluru

MoHFW

10

Total

 

 

38

 

जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत (एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, एनसीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इंस्टेम बंगळूरू, एनआयएमएचएएनएस बंगळूरू, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली)  बाधित नमुन्यांची चाचणी घेण्यात येत आहे.

या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये अलगीकरणात स्वतंत्र खोलीत ठेवले आहे. या सर्व व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना देखील विलगीकरणात ठेवले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि इतरांसाठी व्यापक संपर्क ट्रेसिंग सुरू केली आहे. इतर नमुन्यांवरील जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सुरू आहे.

ही परिस्थिती सावधगिरीने हाताळली जात असून ही  देखरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे, चाचणी करणे आणि आयएनएसएसीओजी प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठविण्याबाबत राज्यांना नियमित सल्ला देण्यात येत आहे.

 

S.Tupe/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1685985) Visitor Counter : 130