माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रसार भारतीने (डीडी-एआयआर) नोंदवली प्रचंड मोठी डिजिटल वाढ


आकाशवाणी आणि दूरदर्शनचा पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षक

Posted On: 03 JAN 2021 8:30PM by PIB Mumbai

 

प्रसार भारतीच्या दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या डिजिटल वाहिन्यांनी 2020 साली  100% वाढ नोंदविली असून त्यात 1अब्ज इतकी दृश्यमानता आणि 6 अब्जांपेक्षा अधिक डिजिटल घड्याळी मिनिटांचा समावेश आहे.

2020 या सालाच्या दरम्यान न्यूज ऑन एअर या अँपची 2.5 दशलक्षांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी जोडणी घेतली आणि आणि लाईव्ह रेडिओ मार्फत 300 दशलक्षांपेक्षा अधिक  वेळा पाहिले गेले असून लाईव्ह रेडिओ स्ट्रीमिंग लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे.

प्रसार भारतीच्या डीडी नॅशनल आणि डीडी न्यूज या वाहिन्यांसोबत ,मराठी बातम्यांची वाहिनी डीडी सह्याद्री आणि डीडी चंदना वरील कन्नड कार्यक्रम ,डीडी बांग्लावरील बंगाली भाषेतील बातम्या आणि डीडी सप्तगिरी वरील तेलगु भाषेतील कार्यक्रम या  प्रसार भारतीच्या वाहिन्यांचा समावेश  पहिल्या दहा वाहिन्यांमधे आहे.

डीडी स्पोर्ट्स आणि आकाशवाणी स्पोर्ट्स या वाहिन्यांनी आपल्या धावत्या समालोचनात्मक कार्यक्रमांद्वारे कायमचा (स्थिर) प्रेक्षकवर्ग तयार केला असून प्रसार भारती अर्काईव्ह्ज आणि डीडी किसान हे डिजिटल मंच पहिल्या दहा क्रमांकांत आहेत.

ईशान्येकडील बातम्यांसाठी महत्त्वाचा ईशान्येकडील मोठा डिजिटल प्रेक्षकवर्ग अधोरेखित झाला असून ,आँल इंडिया रेडिओची ईशान्य सेवा ही देखील पहिल्या दहा क्रमांकात आहे आणि त्यांनी एक लाखांचा मैलाचा दगड पार केला आहे.

विशेष म्हणजे डीडी आणि एआयआरच्या कार्यक्रमांसाठी  स्वदेशी प्रेक्षकांनंतर, पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकाचा डिजिटल प्रेक्षक म्हणून नोंदविला गेला आहे त्या नंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो.

2020 सालातील डिजिटल व्हिडिओंमधे सर्वाधिक लोकप्रियता पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी केलेला संवाद, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीची कवायत आणि डीडी नॅशनलच्या 1970 सालच्या जुन्या कार्यक्रमातील  शकुंतला देवी यांचा एक दुर्मिळ व्हिडिओ, या कार्यक्रमांना लाभली आहे.

2020 साली प्रसार भारतीने समग्र संस्कृत भाषेतील कार्यक्रमांना समर्पित अशा  एका यू ट्यूब चॅनेलला आरंभ केला,ज्यात डीडी आणि रेडिओने तयार केलेल्या संस्कृत भाषेतील कार्यक्रम संपूर्ण देशभरातील डीडी वाहिन्यांवर अपलोड करण्यात आले,जेणेकरून सर्व दर्शकांना त्याचा लाभ सहजपणे घेता यावा.

मन की बात ला समर्पित असलेले यू ट्यूब चॅनेल आणि ट्विटर हँडल यात 2020 साली  झपाट्याने वाढ झाली असून, मन की बात ट्वीटर हँडलचे  67,000 फाॅलोअर्स आहेत. यू ट्यूब चॅनेलवर मन की बातचे विविध एपिसोड  वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांत उपलब्ध आहे.

डीडी, एआयआरवर विविध भारतीय  भाषांतील 1500 नभोनाट्य  उपलब्ध असून ती डिजीटाईझ करुन आपल्या यू ट्यूब चॅनेलवर अपलोड केली जात आहेत.

हजारो तासांच्या शैक्षणिक कार्यक्रमांची सामुग्री आणि दूरदर्शन वर्ग विविध भारतीय भाषांमधून आपल्या यू ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.

दुर्मिळ आणि ऐतिहासिक मूल्य असलेली अर्काईव्हल सामुग्री डीडी एअरवर उपलब्ध आहे आणि ती प्रसार भारती अर्काईव्हल यू ट्यूब चॅनेलवर डिजीटाईझ करुन अपलोड करण्यात येत आहे.   देशभरातील विविध डीडी आणि आकाशवाणीच्या स्थानकांवर उपलब्ध असलेल्या  सांगितीकसांस्कृतिक, राजनैतिक अशा कार्यक्रमांच्या हजारो ध्वनिफिती एकत्र करण्याचे कार्य करण्यासाठी एक समर्पित चमू  जनहितार्थ काम  करत आहे.अशाप्रकारे ही सामुग्री शैक्षणिक आणि संशोधनात्मक कामासाठी  सार्वजनिकरीत्या उपलब्ध केली जात आहे.

***

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685872) Visitor Counter : 223