इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय : वर्ष समाप्ती आढावा 2020
आरोग्य सेतु जवळपास 17 कोटी वेळा डाउनलोड केले गेले; संभाव्य कोविड -19 हॉटस्पॉटच्या मोठ्या संख्येचा अंदाज वर्तवला
डिजीलॉकरने 5.19 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचे उद्दिष्ट गाठले ; 722 संघटनांकडून 426 कोटी कागदपत्रे जारी करण्यात आली
Posted On:
02 JAN 2021 11:45PM by PIB Mumbai
2020 दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हाती घेतलेले प्रमुख ई-प्रशासन कार्यक्रम आणि उपक्रम, ज्यात महामारीदरम्यान दिलेल्या सहाय्याचा समावेश आहे ,ते पुढीलप्रमाणे आहेत :
- आरोग्य सेतु हे संपर्कात आलेल्यांचा शोध घेणारे ऍप्प 16.71 कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे आणि मोठ्या संख्येने संभाव्य कोविड -19 हॉटस्पॉट्सचा यशस्वीपणे अंदाज वर्तवला आहे.
- मायगव्ह मंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10 कोटींपेक्षा जास्त वापरकर्त्यांसह 1.45 कोटींपेक्षा जास्त नोंदणीकृत वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले आहे; प्रमुख उपक्रमांमध्ये साथी चॅट बॉट, पॉझिटिव्ह हार्मनीज, मायगव्ह पॉडकास्ट फॅक्ट चेकर, व्हाट्सएप चॅटबॉट, टेलिग्राम आउटरीच इत्यादीचा समावेश आहे आणि श्री शक्ती चॅलेंज, ड्रग डिस्कवरी चॅलेंज, एआय चॅलेंज सारख्या विविध नाविन्यपूर्ण आव्हानांचा समावेश आहे.
- सरकारी व खाजगी विभागांनी जारी केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी डिजीलॉकर या डिजिटल प्लॅटफॉर्मने 5.19 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचे उद्दिष्ट साध्य केले;722 संघटनांनी 426 कोटी दस्तावेज जारी केले. .
- भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) प्लॅटफॉर्म असलेल्या नॅशनल सेंटर फॉर जिओ-इनफॉरमॅटिक्स (एनसीओजी) ने 29 केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि संस्था आणि 19 राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 550 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत.
- लर्निंग मॅनेजमेंट प्रणालीने 2,337 ई-वर्ग आयोजित केले आणि 73 संस्थांकडून 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी 5,540 ई-सामग्री पुरवली आहे .
- उमंग मोबाइल ऍप्प (अँड्रॉइड, आयओएस आणि केएआयओएस) एक एकत्रित व्यासपीठ आहे जे प्रमुख सरकारी सेवा (केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्था) एकत्रित करते, 2084 सेवा उपलब्ध आहेत आणि अॅप आधार, डिजीलॉकर , पेमेंट गेटवे इत्यादींनी युक्त आहे.
- आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), रेज 2020 या विषयावरील भारताच्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले या आभासी शिखर परिषदेसाठी 147 देशांतील 79,000 पेक्षा जास्त नोंदणीकृत वापरकर्त्यांसह 21 देशांतील 320 हून अधिक मुख्य वक्ते सहभागी झाले ; एआय स्टार्टअप चॅलेंजमध्ये 299 स्टार्टअपचा सहभाग दिसून आला
- आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज 9 श्रेणीसाठी (व्यवसाय, ई-लर्निंग, करमणूक, खेळ, आरोग्य इ.) सुरू करण्यात आले; 6,900 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या त्यापैकी विविध प्रकारातील 24 ऍप्सना पुरस्कार देण्यात आले तर इतर 20 अॅप्सना विशेष उल्लेखनीय म्हणून गौरवण्यात आले.
- उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉमने डिजिटल कौशल्य उपक्रम सुरू केला; पुढील 5 वर्षात 7 लाख आयटी व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे..
- जन धन योजना - सुमारे 1.32 लाख कोटी रुपये निधीसह 41.49 कोटी लाभार्थी; 1.26 लाख बँक मित्र घरोघरी बॅंकिंग सेवा पुरवतात
- आधार - 127 कोटी नोंदणी, 4,947 ई-प्रमाणीकरण आणि 879 कोटी ई-केवायसी झाले आहेत .
- केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील ई-प्रशासन प्रकल्पांद्वारे ऑनलाईन व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन ऍग्रीगेशन अँड ऍनालिसिस लेअर (ई ताल ) डॅशबोर्ड (आयओएस आणि अँड्रॉइड अॅप उपलब्ध).
- जीईएमच्या मंचावर 9 लाख विक्रेत्यांची 1.8 दशलक्ष उत्पादने आणि 60,000 सेवा असून 18,904 नोंदणीकृत खरेदीदार संस्थांनी खरेदी केल्या आहेत; एमएसईकडून ऑर्डर मूल्याच्या 57.88 % पेक्षा जास्त म्हणजेच 74,229 कोटींचे व्यवहार झाले आहेत
- ओपन गव्हर्नमेंट डेटा (ओजीडी) मंचावर नागरिकांना डाउनलोडसाठी 4.57 लाख डेटासेट उपलब्ध आहेत; 174 मंत्रालय / विभागांमधील 354 मुख्य डेटा अधिकार्यांकडून डाटा राखला जातो.
- नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन प्लॅटफॉर्मवर भारतीय भाषांमध्ये नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभागास प्रोत्साहन देण्यासाठी 4 स्टार्टअप्स इन्क्युबेशन प्रक्रियेत आहेत.
- ई-हॉस्पिटल हे रूग्ण, रूग्णालये आणि डॉक्टरांना जोडणारे वन स्टॉप सोल्यूशन,असून सुमारे 17.5 कोटी व्यवहारांसह 418 आस्थापनांमध्ये राबवण्यात आले आहे.
- सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) - 12 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकर्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 37,000 ग्रामीण पातळीवरील महिला उद्योजक आहेत.
- जीवन प्रमाण ही निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) ऑनलाईन सादर करण्यासाठी बायोमेट्रिक-सक्षम डिजिटल सेवा असून नोव्हेंबर 2020 पर्यंत 4..31 कोटी डीएलसी जारी करण्यात आले आहेत.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1685782)
Visitor Counter : 222