राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती भवनाचे वस्तुसंग्रहालय 5 जानेवारीपासून जनतेसाठी खुले होणार
Posted On:
01 JAN 2021 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021
कोविड-19 मुळे 13 मार्च 2020, पासून बंद ठेवण्यात आलेले राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल 5 जानेवारी 2021 पासून जनतेसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. हे संकुल सोमवार आणि सरकारी सुट्यांचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी खुले राहील. या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी अभ्यागतांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी, खालील संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल.
https://presidentofindia.nic.in or https://rashtrapatisachivalaya.gov.in/ or https://rbmuseum.gov.in/
त्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्रतिव्यक्ती रु. 50/- इतके नाममात्र नोंदणी शुल्क आकारले जाईल. पूर्वी उपलब्ध असलेली प्रत्यक्ष जागेवर नोंदणी करण्याची सुविधा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यासाठी आगाऊ नोंदणीची चार सत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सकाळी 9.30 ते 11.00, 11.30 ते दुपारी 1.00, दुपारी 1.30 ते 3.00, दुपारी 3.30 ते संध्याकाळी 5.00 या वेळांमध्ये प्रत्येक सत्रामध्ये केवळ 25 अभ्यागतांनाच प्रवेशाची परवानगी दिली जाईल. या भेटीदरम्यान अभ्यागतांना मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे, आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे या कोविडविषयक मार्गदर्शक नियमांचे पालन करावे लागेल. कोविड-19 चा सर्वात जास्त धोका असलेल्या गटातील व्यक्तींना प्रवेशाची अनुमती नसेल.
राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल हे एक घटनांवर आधारित कहाणी सांगणारे वस्तुसंग्रहालय असून त्यामध्ये कला, संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि इतिहासाचे प्रतीक असणाऱ्या अतिशय दुर्मीळ आणि मौल्यवान पुरातन वस्तू पाहायला मिळतात. याविषयीचा अधिक तपशील https://rbmuseum.gov.in/. या संकेतस्थळावर पाहता येईल.
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1685434)
Visitor Counter : 283