श्रम आणि रोजगार मंत्रालय
“श्रमेव जयते” या मंत्रानुसार सरकार कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2020 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2020
कामगार व रोजगार राज्यमंत्री श्री.संतोषकुमार गंगवार यांनी आज झालेल्या कार्यक्रमात कामगार मंडळाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त कामगार मंडळावर विशेष मुद्रांक प्रसिद्ध केला. टपाल कार्यालयाचे महासंचालक विनीत पांडे देखील यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कामगार मंडळाला विशेष संदेश दिला. आपल्या संदेशामध्ये पंतप्रधानांनी मंडळाच्या शताब्दी वर्षात विशेष मुद्रांक प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतांना सांगितले की गेल्या शंभर वर्षांपासून मंडळाने मोठ्या निष्ठेने आणि समर्पणाने कामगार, मूल्य आणि रोजगाराचे जतन केले आहे. “श्रमेव जयते” या मंत्राच्या भावनेचे पालन करीत कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या सरकारने कामगारांसाठी सतत आणि एकात्मिक पावले उचलली आहेत, असे देखील या संदेशात म्हंटले आहे.

तीन ऐतिहासिक कामगार कायदे केवळ कष्टकरी कामगारांच्या हिताचेच संरक्षण करणार नाहीत तर उत्पादकता वाढीसाठी उच्च स्तरावर आधार देतील असेही मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. पंतप्रधानांनी आपल्या संदेशात असेही सांगितले की, कामगार व कामगारांच्या विश्वासार्ह आकडेवारीची उपलब्धता प्रभावी धोरण तयार करण्यासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी नियोजन करण्यासाठी आवश्यक आहे. विविध क्षेत्रातील डेटाचे महत्त्व आणि त्याचा वाढता वापर लक्षात घेता कामगार आणि रोजगाराच्या क्षेत्रात चांगले धोरण तयार करण्यासाठी मंडळाचा डेटा उत्पादनाचा समृद्ध वारसा संपूर्णपणे वापरला जाणे आवश्यक आहे. तसेच डेटा संकलन, विश्लेषण आणि प्रसार या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळ आपल्या कार्यात सुधरणा करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी मंडळाच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1684692)
आगंतुक पटल : 207