पंतप्रधान कार्यालय
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे तिरंगा फडकवल्याच्या घटनेच्या 75 व्या वर्धापनदिनी पंतप्रधानांनी बोस यांचे केले स्मरण
Posted On:
30 DEC 2020 4:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2020
पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी तिरंगा फडकवला होता, त्या घटनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ब्लेअर येथे जाऊन तिरंगा फडकवला आणि बोस यांना आदरांजली अर्पण केली. अशी माहिती पंतप्रधानांनी व्टिटरच्या माध्यमातून दिली.
‘‘दि. 30 डिसेंबर, 1943... हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या कायम स्मरणात राहणारा दिवस आहे. शूर नेताजी सुभाष बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे याच दिवशी तिरंगा फडकवला होता. या घटनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त मी, आज पोर्ट ब्लेअरला गेलो आणि आजच्या विशेष दिनी तिथे तिरंगा फडकवण्याचा मला सन्मान मिळाला. काही आठवणी सामायिक करीत आहे.’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिटर संदेशात म्हटले आहे.
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1684653)
अभ्यागत कक्ष : 227
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam