आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

इंडियन  सार्स -सीओव्ही -2 जिनोमिक्स कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) प्रयोगशाळांनी सार्स -सीओव्ही -2 च्या म्युटंट व्हेरिएन्टच्या जीनोम सिक्वेन्सिंगचे प्रारंभिक निकाल जाहीर

Posted On: 29 DEC 2020 12:28PM by PIB Mumbai

 

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या सार्स-सीओव्ही -2 विषाणूच्या उत्परिवर्तनाच्या वृत्ताची केंद्र सरकारने  दखल  घेतली आणि म्युटंट व्हेरिएन्ट (उत्परिवर्तन प्रकार)  शोधण्यासाठी व तो रोखण्यासाठी एकसक्रिय आणि प्रतिबंधात्मक धोरण आखले.

या धोरणामध्ये खालील उपाययोजनांचा समावेश आहे, परंतु  तेव्हढ्यापुरते ते मर्यादित नाही: -

ब्रिटनमधून  23 डिसेंबर 2020 च्या मध्यरात्रीपासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत येणाऱ्या सर्व उड्डाणांचे तात्पुरते निलंबन.

आरटी-पीसीआर चाचणीद्वारे ब्रिटनमधून परतलेल्या सर्व विमान प्रवाशांची अनिवार्य चाचणी. आरटी-पीसीआर चाचणीत बाधित आढळलेल्या ब्रिटनमधून परतलेल्या सर्व नागरिकांच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग 10 सरकारी प्रयोगशाळांच्या गटाकडून केले जाईल.

चाचणी, उपचार, देखरेख आणि प्रतिबंध धोरण यावर विचार व शिफारस करण्यासाठी 26 डिसेंबर 2020 रोजी कोविड -19 वरील राष्ट्रीय कृतिगटाची (एनटीएफ) बैठक

22 डिसेंबर 2020 रोजी जारी केलेल्या सार्स -सीओव्ही -2 च्या म्युटंट व्हेरिएन्टचा सामना करण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसाठी मानक कार्यप्रणाली

एनटीएफने 26 डिसेंबर 2020 रोजी संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली आणि एनटीएफने असा निष्कर्ष काढला की म्युटंट व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर विद्यमान राष्ट्रीय उपचार प्रोटोकॉल किंवा विद्यमान चाचणी प्रोटोकॉल बदलण्याची गरज नाही. एनटीएफने अशीही शिफारस केली की विद्यमान देखरेख धोरणाव्यतिरिक्त, जीनोम संबधी देखरेख ठेवणे देखील आवश्यक आहे.

25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2020 च्या मध्यरात्री दरम्यान सुमारे 33,000 प्रवासी ब्रिटनमधून भारतातील विविध विमानतळांवर उतरले. या सर्व प्रवाशांचा  मागोवा राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी आरटी-पीसीआर चाचणीआधारे  घेतला आहे. आतापर्यंत केवळ 114 लोक बाधित आढळले आहेत. हे सकारात्मक नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी 10 आयएनएसएसीओजी प्रयोगशाळांकडे (एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इंस्टेम बंगळुरू, निमहंस बंगळुरू , आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली) यांना पाठविण्यात आले आहेत.

नवीन यू.के. व्हेरिएंट जीनोमसह ब्रिटनमधून परतलेल्या 6  व्यक्तींचे एकूण 6 नमुने सकारात्मक असल्याचे आढळले आहे. निमहंस, बंगळुरूमध्ये 3, सीसीएमबी, हैदराबादमध्ये 2 आणि एनआयव्ही, पुणे येथे 1.

या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये स्वतंत्र खोलीत अलगीकरणात ठेवले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यानाही विलगीकरणात ठेवले  आहे. सहप्रवासी, कौटुंबिक संपर्क आणि इतरांसाठी व्यापक संपर्क शोध मोहीम  सुरू केली गेली आहे. इतर नमुन्यांवर जीनोम सिक्वेन्सिंग सुरु आहे.

या परिस्थितीवर सावधगिरीने लक्ष ठेवले जात आहे. आणि आयएनएसएसीओजी प्रयोगशाळांमध्ये वाढीव देखरेख व्यवस्था, प्रतिबंध, चाचणी आणि नमुने पाठवण्याबाबत राज्यांना नियमित सल्ला दिला जात आहे.

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की नवीन यूके व्हेरिएंटचे अस्तित्व  डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूरमध्येही आढळले आहे.

 

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1684307) Visitor Counter : 248