पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 28 डिसेंबर रोजी 100 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार
Posted On:
26 DEC 2020 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी साडेचार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालीमार पर्यंत धावणाऱ्या 100 व्या किसान रेल्वेला झेंडा दाखवून रवाना करतील. यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि पीयूष गोयल देखील उपस्थित राहणार आहेत.
या अनेक प्रकारच्या मालाच्या एकत्रित रेल्वे वाहतूक सेवेमध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, कोबी, शेवग्याच्या शेंगा, मिरची, कांदा अशा भाज्या तसेच द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळी, सीताफळ इत्यादी फळे असतील. मार्गातील सर्व थांब्यांवर मालवाहतुकीच्या या रेल्वेच्या आकाराला कोणतेही बंधन न ठेवता नाशिवंत माल ट्रेन मध्ये भरणे आणि उतरवण्याला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने फळ आणि भाज्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के सवलत दिली आहे.
किसान रेल विषयी:
पहिली किसान रेल्वे 7 ऑगस्ट, 2020 रोजी देवळाली ते दानापूर पर्यंत चालवण्यात आली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत हा प्रवास वाढविण्यात आला. शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही रेल्वे सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु करण्यात आली.
देशभरात कृषी उत्पादनांची जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी किसान रेल्वेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे. ही सेवा नाशिवंत उत्पादनांची अखंड पुरवठा साखळी प्रदान करते.
* * *
G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683893)
Visitor Counter : 190
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam