राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींकडून नागरिकांना ख्रिसमसच्या पूर्व संध्येला शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 24 DEC 2020 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2020


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ख्रिसमसच्या पूर्व संध्येला देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ख्रिसमसच्या मंगल प्रसंगी देशातल्या जनतेला, विशेषकरून आपल्या ख्रिस्ती बंधू-भगिनींना शुभेच्छा.

प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याचा हा सण. हा सण लोकांच्या जीवनात शांतता, सद्भावना आणि करुणा निर्माण करतो. आपली मने परस्परांप्रती स्नेह आणि दया यांनी उजळणारा हा सण असल्याचे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

हा सण संपूर्ण जगभरात शांततेची जोपासना करून मानव जगतात सलोखा कायम ठेवण्यासाठी माध्यम ठरावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. येशू ख्रिस्त यांची प्रेम, करूणा आणि मानवतेची शिकवण पुन्हा आत्मसात करत आपले राष्ट्र आणि समाजाच्या कल्याणाप्रती कटीबद्ध होण्याचे आवाहन त्यांनी संदेशात केले आहे.

राष्ट्रपतींच्या संपूर्ण संदेशासाठी इथे क्लिक करा


* * *

S.Thakur/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1683377) आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Odia , Tamil , Telugu